शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंदनगरात १२०० रहिवाशांसाठी फक्त २० शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:37 IST

गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे.

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे. या समस्यांबरोबरच याच भागातून जाणाऱ्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा नागरिकांकडून टाकला जात आहे. अस्वच्छता, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत महापालिकेने लक्ष देत सुविधा पुरविण्याची अपेक्षा मिलिंदनगरवासीयांनी केली आहे.तिडके कॉलनी परिसरातील मिलिंदनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी रहात असून, या रहिवाशांना मनपाच्या माध्यमातून सुविधा दिल्या जात नसल्याने मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, साफसफाई करण्यासाठी मनपाचे कर्मचारी कधीतरी येतात. या भागातील बहुतांशी पथदीप बंद असून, चालू असलेले पथदीप हे रात्री उशिराने सुरू होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मिलिंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी असून, त्यांच्यासाठी केवळ २० शौचालये आहेत. यातील बहुतांशी शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, याठिकाणीदेखील लाइटची व्यवस्था नाही. तसेच शौचालयाची दैनंदिन साफसफाई होणे गरजेचे असताना महिनाभरानंतर वरवर स्वच्छता केली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने रस्त्यावर खराब पाणी साचत असून, यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असल्याचे पप्पू चाचकर, शंकर बागुल यांनी सांगितले. या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना नाइलाजास्तव कचरा हा नंदिनी नदीत टाकावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने मूलभूत सुविधा देण्याबरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान तसेच जिमची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सदाशिव लहामगे, सागर वाघमारे यांनी सांगितले. नंदिनी नाल्यालगत घर असलेल्या नागरिकांना नाल्यातील दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत असून, या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा तसेच घाण टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे विमल वाडगावकर, राजेंद्र साबळे यांनी सांगितले. मिलिंदनगर भागात लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालये कमी असून, यासाठी मनपाने याठिकाणी शौचालयांची संख्या वाढविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका