शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्केच तिकिटे पंचवटीसाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:33 IST

कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह एकूण ८० स्पेशल ट्रेन देशभरात १२ सप्टेंबरपासून सोडल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देआजपासून सुरू : खबरदारीच्या उपाययोजना

नाशिकरोड : कोरोनामुळे गेल्या २२ मार्चपासून बंद असलेली चाकरमान्यांची पंचवटी एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू होत असली तरी, एक्स्प्रेस सुटण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत जेमतेम २० टक्केच आरक्षण तिकीट विक्रीस गेल्याने पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पंचवटीसह एकूण ८० स्पेशल ट्रेन देशभरात १२ सप्टेंबरपासून सोडल्या जाणार आहेत.पंचवटीत एक्स्प्रेसमध्ये १७१४ सीटस आहेत. त्यात सेकंड क्लासचे १५२२, आणि एसीचे १९२ सीट््स आहेत. त्यातील वीस टक्केही तिकिटे विकली गेली नाहीत. गाडीच्या आदल्या दिवशी सायंकाळी साडेसहापर्यंत सेकंड क्लासची २७३, तर एसीची सहा तिकीट विकली गेली आहेत. मुंबईला जाण्यासाठी ९० रुपये तिकिटाचे व ३० रुपये आरक्षणाचे असे १२० रुपये द्यावे लागत आहेत. रोजचा जाऊन-येऊन एकूण २४० रुपये खर्च आहे. कोरोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागेल. केवळ वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येईल तसेच प्रतीक्षायादीतील प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाही.मुंबईहून परत येतानाही दीड तास आधी स्टेशनवर हजर रहावे लागणार आहे. येऊन-जाऊन तीन तास जादा लागणार आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्याचे ठरविण्यात आले असून, प्रवासापूर्वी थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांना किमान ९० मिनिटे अगोदर यावे लागेल.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे