शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अवघे १२५३ पाळीव श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:44 IST

शहरात दरवर्षी होणाऱ्या ‘डॉग शो’च्या माध्यमातून मोठ्या संख्येने पाळीव श्वान दिसून येत असतात. धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांकडे पाळलेले श्वान आढळून येते. मात्र, शहरात केवळ १२५३ पाळीव श्वानांसाठीच महापालिकेकडून अधिकृतरीत्या परवाने वितरित करण्यात आले आहेत.

नाशिक : शहरात दरवर्षी होणाऱ्या ‘डॉग शो’च्या माध्यमातून मोठ्या संख्येने पाळीव श्वान दिसून येत असतात. धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांकडे पाळलेले श्वान आढळून येते. मात्र, शहरात केवळ १२५३ पाळीव श्वानांसाठीच महापालिकेकडून अधिकृतरीत्या परवाने वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेत खास पशुसंवर्धन विभाग कार्यान्वित केला असला तरी, आजारी पाळीव श्वानांवर उपचार करणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही.  माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांनी पशुसंवर्धन व आरोग्य विभागाला विचारलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे. महापालिकेमार्फत शहरात भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. त्यावर लाखो रुपये खर्ची घातले जातात.  मात्र, आजारी व पिसाळलेल्या श्वानांवर उपचार करणारी यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही. महापालिकेने आजवर किती श्वानांची तपासणी केली याबाबतही माहिती उपलब्ध नाही. पाळीव श्वानांचा अधिकृत असा सर्व्हेच झालेला नाही.श्वान नोंदणीबाबत उदासीनतापाळीव श्वानांसाठी महापालिकेचा परवाना अनिवार्य आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने स्टिकर्स तयार करून जनावरांच्या दवाखान्यात प्रबोधन करण्याचे म्हटले असले तरी स्टिकरसंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पाळीव कुत्र्यांच्या परवान्यासाठी मनपाने ५० रु पये श्वान कर, २५ रु पये अनुज्ञापत्र, २५ रु पये बॅच असे नवीन नोंदणीकरिता १०० रु पये आणि नूतनीकरणाकरिता ५० रु पये निश्चित केल्याचे म्हटले आहे. मात्र नोंदणीबाबत श्वानमालकांमध्ये उदासीनता दिसून येते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका