शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गुरु कुलातही ‘आॅनलाइन’ अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST

गुरुकुल म्हणजेच गुरु गृही निवासी राहूनच वेद अध्ययन अध्यापन होत असते. नाशिक तीर्थक्षेत्राला गुरुकुलाची प्राचीन परंपरा लाभली आहे. परंतु कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गुरुकुलातील छात्रांना स्वघरी पाठविण्यात आले आहे. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमधील सर्व छात्र घरीच बसून मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे अध्ययन करीत आहेत.

ठळक मुद्देछात्रांना प्रशिक्षण : महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचा उपक्रम

नाशिक : गुरुकुल म्हणजेच गुरु गृही निवासी राहूनच वेद अध्ययन अध्यापन होत असते. नाशिक तीर्थक्षेत्राला गुरुकुलाची प्राचीन परंपरा लाभली आहे. परंतु कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गुरुकुलातील छात्रांना स्वघरी पाठविण्यात आले आहे. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानमधील सर्व छात्र घरीच बसून मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे अध्ययन करीत आहेत.मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित उज्जैनमधील महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान संलग्न देशभरातील सर्व वेद पाठशाळा यांना छात्र अध्ययन पूर्ण व्हावे यासाठी तसेच छात्र्यांचे वर्ष वाया जाता कामा नये म्हणून सर्व वैदिक कुलगुरूंना गुरुकुल यांना आॅनलाइन व्हिडिओद्वारे शिकवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचवटीतील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने छात्र रोज आपापल्या विषयाचे रोज एक तास गुरुजींकडून आॅनलाइन अध्ययन घेत आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या अन्य राज्यांतील छात्राबरोबरच औरंगाबाद, नांदगाव, सिन्नर, जालना, येवला आदी शहरात असलेले सुमारे २५ छात्र रोज नियमाने अध्ययन करीत आहेत.‘गुरुबिन ज्ञान नाही’ हे खरे असून, इतर विषय किंवा आधुनिक विषय वाचून कळतात, पण तू वेद अध्ययन हे गुरुंनी सांगितल्यावरच ते उच्चारायचे असते. कारण केवळ शब्द वाचून म्हणणे योग्य नसते. गुरु कडे मुख करून वेद पठण सांगितले आहे. कोणतीही महामारी असो किंवा काही अडचण असेल गुरु ने प्रत्यक्ष मंत्र दिल्यावर तो म्हणायचा दंडक आहे. एकदा मंत्राची घेतल्यावर गुरुंना तो हस्त स्वरा सहित म्हणून दाखविणे व आज्ञा मिळाल्यावर ११ वेळेस पठण करून म्हणावी लागते.

गुरु कुलाच्या परंपरेनुसार पंधरा दिवसांत वीस ते पंचवीस मंत्रांची एक संथा अशा १६ संथा पूर्ण कराव्या लागतात. गुरु चरणी यम-नियम पाळून संथा कंठस्थ करून दाखविणे व पुन्हा नवीन मंत्राची संथा घेणे हे व्हिडिओद्वारा सांगत असताना अनेक अडचणी आहेत, परंतु काळानुरूप अध्ययन- अध्यापन सुरू ठेवणे हेच खरे कौशल्य आहे. - वेदमूर्ती रवींद्र पैठणे, गुरु जी

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण