मुख्याध्यापिका .शोभा गायकवाड यांनी डॉ. सी.वी.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनासाठी भाऊसाहेब खातळे, नानासाहेब महाले, राधाकृष्ण नाईकवाडे, सुरेंद्र कोठावळे, मनिषा हिरे .एस.आर.पवार, मंगला पवार, .मीनाक्षी गायधनी, पुष्पा लांडगे,इ मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी निवडक १२ विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे सादरीकरण घरूनच केले. ऑनलाईन कार्यक्रमासाठी गुगल मीट व यु-ट्यूब लाईव्हवर सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला.
विज्ञान दिनाची माहिती दीपाली बागुल यांनी सांगितली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .सुलक्षणा हांडोरे यांनी केले व आभार अर्चना आहेर यांनी मानले. तांत्रिक नियोजनात विलास जाधव, सुनील मांडवडे,गणेश चौरे,.चेतन सूर्यवंशी,.जितेंद्र आहेर यांचे सहकार्य केले.
===Photopath===
030321\03nsk_27_03032021_13.jpg
===Caption===
अभिनव शाळेत विज्ञान प्रदर्शन