शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:30 IST

वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे.

ठळक मुद्देमोडाळेच्या विद्यार्थ्यांची कसरत : शाळेकडूनही प्रशासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे.ग्रामीण दुर्गम भागात अनेकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नाही आणि ज्याच्याकडे आहे त्यांना नेटवर्कसाठी झुंजावे लागत आहे. मोडाळे गावात तर नेटवर्कसाठी मुलांना एक किलोमीटर पायी जात डोंगरमाथा गाठावा लागत असून, त्यातून आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. दरम्यान, गावात नेटवर्क उपलब्ध होत नसल्याचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला पाठविला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव सगळीकडे डोंगर रांगानी वेढलेले आहे. त्यामुळे या गावात कोणत्याच मोबाइल कंपनीला नेटवर्क मिळत नाही. शासनाने मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुलांना आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू केला आहे, परंतु तो ग्रामीण भागात अडचणीचा ठरत आहे.कोरोनाच्या धर्तीवर हा पर्याय जरी योग्य असला तरी ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे मोबाइल असूनही नसल्यासारखाच आहे. मोडाळे गावातदेखील अशीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना चक्क धडे गिरविण्यासाठी मोबाइल घेऊन एक किमी पायी चालत डोंगरावर जावे लागते. याठिकाणी मोबाइलची रेंज मिळत असल्याने विद्यार्थ्यांना डोंगरावर जाताना विषारी प्राण्यांच्या भीतीने आपला जीव मुठीत धरून ही कसरत करावी लागत आहे. बऱ्याचदा नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आमच्या गावात कुठल्याही मोबाइलला नेटवर्क कव्हरेज मिळत नाही. परिणामी फोन करायचा असल्यास गावाशेजारील डोंगरावर जावे लागते. ग्रामपंचायतीच्या वतीने मागणीदेखील केली असताना कुठलीच नेटवर्क कंपनी दखल घेत नाही.- मंगला बोंबले, सरपंचमोडाळे गावात कोणत्याच मोबाइल कंपनीचेनेटवर्क मिळत नाही तसेच गावातील प्रत्येक पालकाची अ‍ॅण्ड्राइड मोबाइल घेण्याची ऐपत नाही. गावात नेटवर्कच मिळत नाही तर आॅनलाइन अभ्यास कसा करणार?- हरिदास सूर्यवंशी, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन शिक्षण देता येत असले तरी मोडाळ्यात कुठल्याच कंपनीला नेटवर्कमिळत नसून तसा अहवालदेखील आम्ही शासनाकडे पाठविला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालून डोंगरावर जाऊ नये.- चंद्रभागा तुपे, मुख्यध्यापक, जिल्हा परिषद शाळा, मोडाळे

टॅग्स :Homeघरonlineऑनलाइन