शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

ऑनलाईन शिक्षण झाले महाग, रिचार्जच्या दरवाढीने विद्यार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 21:48 IST

मालेगाव: एकदा का सवय माणसाला लागली तर ती सुटणं अशक्यप्राय आहे असे म्हटले जाते अगदी तसेच आज जगाच्या पाठीवर कोरोनाने थैमान घातलेले असून गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. वऑनलाईन शिक्षण चालू आहे.

ठळक मुद्देजवळपास पंचवीस टक्के दरवाढ

मालेगाव: एकदा का सवय माणसाला लागली तर ती सुटणं अशक्यप्राय आहे असे म्हटले जाते अगदी तसेच आज जगाच्या पाठीवर कोरोनाने थैमान घातलेले असून गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. वऑनलाईन शिक्षण चालू आहे.ऑनलाइन शिक्षण हे मोबाईलच्या माध्यमातूनच असून दरवाढ मोठ्याप्रमाणात दूरसंचार कंपन्यांची मनमानी नुसार दरवाढ केली. जवळपास पंचवीस टक्के दरवाढ असून ग्रामीण भागात व शहरी भागात ऑनलाईन शिक्षणासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागत आहेत. ही छुपी दरवाढ झाल्याने ग्राहक म्हणजेच पालक मेटाकुटीस आले आहेत. दूरसंचार क्षेत्रात क्रांती होत असताना जिओ एअरटेल रिलायन्स आणि व्होडाफोन या प्रमुख दूरसंचार कंपन्यांचे सिम कार्ड द्वारे ग्राहक मोबाईल सेवा वापरत आहेत मात्र त्यां कंपन्यांची इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने वापर करतांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहेरिचार्जसाठी मोठी रक्कम देऊननही इंटरनेट सेवा चालेल याचा भरवसा नाही. गेल्या अनेक दिवसापासून पूर्णपणे विस्कळित झाली आहे. रिचार्जसाठी मोठी रक्कम देऊन सेवा जर मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्याच्या मोबाईलसाठी महागडी नेट रिचार्ज खरेदी करून पालक मेटाकुटीस येत आहे. सध्या विविध व्यवसायाचे ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटची अत्यंत गरज आहे. सर्व शासकीय योजना सुद्धा या इंटरनेट शिवाय आता पुढे जायला तयार नाहीत. प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटवर आधारित झालेली आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका इंटरनेटवरच होत असून त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. तक्रारी करूनही दूरसंचार कंपन्या दाद देत नाही याचा अर्थ सरकारचा वचक राहिलेला नाही. ज्यावेळेस पासून खाजगीकरणाला सुरुवात झाली त्यावेळेस पासून तर आजतागायत दिवसेंदिवस खाजगी कंपन्यांची मनमानी केल्याचे आढळून येत आहे आज २५ टक्के दरवाढ झाली आहे. मोबाईल कंपन्यांनी इंटरनेट सेवेचा शुभारंभ केला खरा पण यावेळी अनेक योजनांचे सुरुवातीला गाजर दाखवत ग्रामीण भागातील व शहरी भागातील ग्राहकांना आकर्षित केले नंतर मात्र सवय झाल्याने आज सर्व ग्राहक मेटाकुटीस आलेले आहेत. शासकीय कार्यालय बँका शाळा महाविद्यालय पोस्ट व इतर खाजगी सायबरर्कॅफे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. इंटरनेटच्या सेवा घेत आहेत मात्र इंटरनेट सेवेचा वारंवार विस्कळीतपणा होत आहे. भरमसाठ पैसे देवुनही त्याचा उपयोग होत नसल्याने आज सर्वत्र संताप व्यक्त होत आहे"सरकारने बीएसएनएलचा सेवेचा लाभ घेण्यासाठी उतरावे"भारत सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीने आता सर्व ग्राहकांना खाजगी कंपनीपेक्षा जर का चांगली सेवा दिल्यास आणखी ग्राहकांची संख्या वाढेल व या खाजगी कंपन्यांच्या मनमानीला आळा बसेल बीएसएनएल कडून सेवा देताना ग्राहकांना खूप अडचणीना सामोरे जावे लागते म्हणून सरकारने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची दरवाढ केली पण त्याचा विचार करून बीएसएनएलने चांगल्या सुविधा दिल्यास आणखी प्रावेट कंपन्यांमधून बाहेर पडतील बीएसएनएल मध्ये ग्राहक म्हणून नक्कीच वाढतील. सरकारने याच्यावर जरूर विचार करावाप्रा रविंद्र मोरे (नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना मालेगांव तालुकाध्यक्ष. )२६५रुपये १जीबी २८दिवस ४७९ रू१,५ जीबी ५६ दिवस २९९रू१•५ २८ दिवस ५९९रू ३जी बि २८ दिवस ५४९ रू२जीबी ५६दिवस ७२० रुपये १.५ जीबी ८४ दिवस व ३००० रुपये २जीबी एक वर्षासाठी अशा सुविधा वाढल्याने सहाजिकच प्लॅन परवडत नाहीत तरी शासनाने यावर निर्बंध घालावेत अशी सर्व ग्राहकांकडून मागणी होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMobileमोबाइल