शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा येथे कांदा व्यापाऱ्याचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:15 IST

सटाणा शहरातील मालेगाव रोडवरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दीपक सोनवणे यांचे दुकान फोडून  अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची  घटना मंगळवारी उघडकीस आली.

सटाणा : शहरातील मालेगाव रोडवरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दीपक सोनवणे यांचे दुकान फोडून  अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची  घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत कांदा व्यापारी हरिश्चंद्र गुलाब सोनवणे (रा.चौगाव रोड, सटाणा) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिश्चंद्र सोनवणे व दीपक सोनवणे हे दोघे गेल्या आठ वर्षांपासून डी.आर.ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावर रावळगाव फाट्याजवळ त्यांचे दुकान आहे.  दिवसभर त्यांनी दुकानात शेतकऱ्यांकडून कांदे खरेदी करून त्यांना पेमेंट केले. सायंकाळी साडेसात वाजता कार्यालय बंद करताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले १ लाख ९५ हजार ७११ रुपये दुकानातील टेबलाच्या ड्राॅवरमध्ये ठेवले व दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी  सकाळी साडेनऊ वाजता दुकानावर  जाताच सोनवणे यांना दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमधील टेबल व त्यातील वस्तू इतरस्त  फेकलेल्या आढळून आल्या. ड्राॅवरमधील १ लाख ९५ हजार ७११ रुपये तसेच दुकानातील दहा हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा २१ इंची एलईडी टीव्ही आणि नऊ हजार रुपये किमतीचे पैसे मोजण्याचे मशीनही गायब असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी