शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा घसरला; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देयेवला : निर्यातबंदी उठविण्याची मागणी; खर्च भरून निघेना

राजापूर : येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सध्या मका आणि कांद्याचे दर कमी होत चालल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. खर्चही भरून निघेल की नाही, याची चिंता सतावत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. पांढऱ्या सोन्याला फक्त पाच हजारापर्यंत दर असून, व्यापारी मनाचा दर शेतकऱ्यांना देत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकºयाची आहे, परंतु सध्या लागवड केलेल्या कांदा लागवडीमध्ये साधारण शेतकºयांची दहा गुंठ्यापासून तर एक एकरापर्यंत कांदा लागवड झालेली आहे. उत्पादनही भरघोस निघाले आहे, मात्र दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.राजापूर येथे सध्या थोड्याफार प्रमाणात का होईना कांदा काढणीला सुरु वात आहे. त्यातच मजुरीचे दर हे वाढल्याने अडचणीत भर पडली आहे. यावर्षी हवामान बदलामुळे कांदा पिकाला जगविण्यासाठी कीटकनाशक व फवारणीचा मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना या हजार ते पंधराशे रु पये दरामध्ये केलेला खर्च वसूल होतो की नाही यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळेल असे धोरण अवलंबून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी सध्या शेतकºयांची आहे.सध्या कांद्याचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने कांद्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे, परंतु दर कमी होत असल्याने केलेला खर्चही वसूल होतो की नाही, याची चिंता लागली आहे. हजार ते पंधराशे रु पये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने निर्यातबंदी उठवावी, जेणेकरून शेतकºयांना दोन पैसे मिळतील व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.- गोकुळ वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा