शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीत साठवलेला कांदा असुरक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:35 IST

कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला ...

ठळक मुद्देचोरीचे सत्र सुरूच : उत्पादक शेतकरी हैराण; चोरट्यांचा डल्ला

कळवण : कांदा पिकाला समाधानकारक भाव असल्यामुळे उच्चांक गाठण्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. ज्या शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला आहे, त्यांना चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. मात्र आता कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे चोरट्यांची त्यावर वक्रदृष्टी पडली असून, कळवण तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५ हजार रुपयांचा २५ क्विंटल कांदा चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) रात्री घडली.येथील राजकुमार देवरे यांची नवी बेज व भेंडी शिवारात शेती आहे. भेंडी शिवारातील शेतातील चाळीत कांदा साठवणूक केली आहे. कांदा चाळीतून एक लाख २५ हजार रुपये किमतीचा साठवलेला २५ क्विंटल कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पोलीस कर्मचारी बोरसे, घरटे यांनी भेट देऊन कांदा चाळीची पाहणी व पंचनामा केला, पिकअप वाहनातून कांदा चोरी झाल्याचा पोलिसांचा कयास असून, वाहतूक मार्गावरून माहीतगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.बुधवारी (दि. ४) सकाळी शेतातील सालदार रामदास माळी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आली. कळवण पोलीस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची फिर्याद दिली.राजकुमार देवरे यांनी मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. बाजारात कांद्याच्या दरात चढउतार होत असल्याने व निश्चित भाव नसल्याने भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील व आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने देवरे यांनी भेंडी शिवारातील शेतातील चाळीत २५० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. मंगळवारी (दि. ३) अज्ञात चोरट्यांनी चाळीचा दरवाजा व जाळी तोडून चाळीतुन २५ क्विंटल कांदा लंपास केला. आजच्या बाजारभावानुसार ५००० रुपये क्विंटलप्रमाणे १ लाख २५ हजार रुपये किमतीचा कांदा चोरी गेला आहे.चाळींवर गस्त...यंदा कांद्याला समाधानकारक भाव असल्याने आता चोरट्यांनी या लाल सोन्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणीदेखील कांदा चोरीच्या घटना समोर आल्याने शेतकऱ्यांना रात्री जागून कांदा चाळ राखावी लागते आहे. 

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी