शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
3
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
4
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
5
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
6
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
7
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
8
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
9
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
10
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
11
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
12
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
13
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
14
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
15
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
16
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
17
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
18
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
19
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
20
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

 कांद्याची दरात उसळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:53 PM

सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे.

ठळक मुद्देक्विंटलला ४१५० रुपये भाव : सटाण्यात चार हजारांचा टप्पा पार

सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे एकवीस हजार क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक होती. सकाळच्या सत्रात सर्वाधिक प्रतिक्विंटल चार हजार १७५ इतका कांद्याला भाव मिळाला तर सरासरी ३६०० ते ३७०० कांद्याला भाव मिळाला. दरम्यान, कांद्याच्या आवकेतही तेजी आली असून, दररोज सरासरी १९ ते २० हजार इतकी कांद्याची आवक असते. नामपूर बाजार समिती आवारातदेखील कांद्याच्या आवकेत सटाण्याइतकीच तेजी होती. मात्र भावात प्रतिक्विंटल आठशे रुपयांची तफावत होती. नामपूरमध्ये सर्वाधिक प्रतिक्विंटल ३३७० रुपये कांद्याला भाव मिळाला तर सरासरी २९०० ते ३००० भाव मिळाला. सटाण्यात कांद्याला भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नामपूर बाजार आवार सोडून सटाणा बाजार आवारात कांदा विक्रीला आणला होता.तीन दिवसात १०७५ रुपयांची वाढ ...सटाणा बाजार आवारात गेल्या शुक्रवारी ३०७५ रुपये सर्वाधिक कांद्याला भाव मिळाला होता. दरम्यान शनिवार आणि रविवारी सुटीचे दिवसवगळता आज सोमवारी तिसºया दिवश्ी कांद्याने भावात अचानक उसळी घेतली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ढगाळ हवामानामुळे साठवलेल्या कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याच्या विक्री प्रमाणात वाढ होऊन परिणामी बाजारात आवक वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याने भावात चार हजारांचा टप्पा पार केला असला तरी खाददेखील भाव खाताना दिसत असून, आज कांद्याची खाद १५०० रुपयांपर्यंत विकली गेली.

 

टॅग्स :onionकांदाagricultureशेती