शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:34 IST

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला.

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला. बाजारभावातील घसरण थांबविण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर गुरूवारी सकाळी लाल कांदा आवक १५०४८ क्विंटल झाली असून बाजारभाव रु पये प्रति क्विंटल किमान १००० ते कमाल २३५२ व सरासरी २००० रूपये जाहीर झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी शंभर रूपयांची कांदा भावात घसरण झाली होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी १२६० वाहनातील १७२४८ क्विंटल आवक झाली. लाल कांदा किमान ९०१ ते कमाल २००१ व सरासरी १७५० रूपये भावाने विक्र ी झाला.तर सोमवारी लासलगांवी २५०४४ क्विंटल लाल कांदा किमान १००० ते कमाल २१११ व सरासरी १८५१ रूपये भावाने विक्र ी झाला होता. आता कांदा निर्यात बंदी उठवली असल्याने कांदा भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे.  बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरन सुरु आहे.अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करण्याची मागणी होत होती.दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर बंदी उठवली जाईल अशी चर्चा होती. लासलगांव मुख्य बाजार समितीसह, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल अली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर, २०१९ पासुन संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या बाणज्यि व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर, २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणा-या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला होता. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापा-यांना २५० क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापा-यांना २५ क्विंटलपर्यंत (०५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागु केली.----------------------उशीरा की होईना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविली आहे. चीनमधुन कांदा निर्यात बंदी कोरोनामुळे आहे. त्यामुळे परत परदेशी बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम करण्यासाठी ही निर्यात बंदी उठणे फारच गरजेचे होते.आता या निर्णयाचा फायदा लवकरच कांदा बाजार भावात होत असलेली घसरण थांबुन भावात सुधारणा झाली असली तरी अजुन होऊ शकते .-सुवर्णा जगताप, सभापती, बाजार समिती लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक