शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे कांदा @ 4950 रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:15 IST

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. ६) कांद्याला किमान २०००, कमाल ४९५० रुपये व सरासरी ४४५१ रुपये दर मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान ११००, कमाल ३६०१ रुपये व सरासरी ३००० रुपये दर मिळाला.कांदा आयात करण्याच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी आहे. पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा फटका पुढील वर्षभर जाणवणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी मिळालेल्या दराने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडविण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाणांची वानवा पाहता, त्याचेही दर गगनाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकºयांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला दर मिळून शेतकरीवर्ग आनंदित झालेला असताना त्यांच्या आनंदावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्यामुळे साठवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत.वणीत कांदा दरात सुधारणावणी : दोन दिवासांपूर्वी सुमारे ४०० रु पये क्विंटलने कमी झालेल्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. गुरुवारी उपबाजारात १०६ वाहनांमधून दोन हजार क्विंटल कांदा शेतकºयांनी विक्र ीसाठी उपबाजारात आणला होता. कमाल ५२९०, किमान ४००० तर सरासरी ४६७५ रु पये क्विंटल दराने उत्पादकांनी कांदा विक्र ी केली. कांद्याच्या दरात गेल्या आठवडाभरापासून चढउताराचे वातावरण आहे. थोडाफार फरक दरात सातत्याने दिसून येतो आहे. मागणी व पुरवठा याचा समन्वय सुरळीत व्यवहार प्रणालीसाठी अपेक्षित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा