वणी : देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी कांद्याला ४०१९ रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्री साठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३०० तर सरासरी ३८०० रु पये प्रति क्विंटलने खरेदी विक्र ीचे व्यवहार पार पडले. सध्या देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढलेली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होत आहे. उत्पादकांना दिवाळी सणाच्या तोंडावर काही अंशी दिलासादायक अशी स्थिती आहे. दरम्यान दिवाळी सणानिमित्त काही दिवस उपबाजारातील खरेदी विक्र ीचे व्यवहार बंद राहणार असल्याने उत्पादकांनी कांदा विक्र ीचा वेग वाढविला आहे. तर व्यापारी वर्गही मागणी प्रमाणे कांदा देशांतर्गत विक्री करत आहे.
कांदा @ चार हजार रूपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:13 IST