शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ट्विटरवरच उठली कांदा निर्यातबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:29 IST

अधिसूचनेची प्रतीक्षा : मात्र कांदा दरात उसळी

ठळक मुद्देकृषी विभागाकडून केंद्राला मिळालेल्या आकडेवारीनुसार येणा-या हंगामामध्ये कांद्याचे विक्र मी उत्पादन होणार असल्यामुळे कांद्याचे दर कोसळू शकतात.

लासलगाव : कांदा निर्यातबंदी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एका ट्विटने उठल्याचे जाहीर झाले असले तरी अदद्याप त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना प्रसिदद्ध न झाल्याने संभ्रम कायम आहे. कांदा उत्पादकांपासून ते खरेदीदारांपर्यंत आता सर्वांनाच अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा लागून राहिली आहे तर एका ट्विटमुळे बाजार समिती आवारात मात्र कांदा दराने उसळी घेतली आहे.बुधवारी (दि.२६) सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न-नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हिंदी मध्ये ट्विट करत तर ७ वाजून २८ मिनिटांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचे संकेत दिले होते. मात्र, या चिवचिवाटाला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही शुक्र वारी (दि.२८) दुपारपर्यंत कुठेही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अधिकृतपणे त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पासवान यांच्या ट्विटचे स्क्र ीन शॉट सोशल मीडियावर फिरत असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात चारशे रु पयांची तेजी दिसून आली. कांद्याचे बाजार भावामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले तर व्यापाऱ्यांमध्ये निर्यात खुली करण्याबाबत अद्याप पर्यंत अधिसूचना न निघाल्याने संभ्रमाचे वातावरण होते.गेल्या नोव्हेबर आणि डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर केंद्र सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी घोषीत केली होती. त्यानंतर कांदा भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. कृषी विभागाकडून केंद्राला मिळालेल्या आकडेवारीनुसार येणा-या हंगामामध्ये कांद्याचे विक्र मी उत्पादन होणार असल्यामुळे कांद्याचे दर कोसळू शकतात. त्यामुळे केंद्र सरकार तर्फे रामविलास पासवान यांनी ट्विट करत कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा