शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

कांदा-कापसाची पीकविमा भरपाई आठ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:59 IST

शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देदादा भुसे : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीची मागणी

मालेगाव : शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.गतवर्षी जानेवारी ते जूनपर्यंत भयानक दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. सुरुवातीला सर्व पिके जोमात असताना सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे बाजरी, कांदा, मका व इतर सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले. नदी काठावरील गावांमधील पिके अक्षरश: वाहून गेली. यात मुख्यत: मका, कांदा, डाळिंब, ऊस, द्राक्ष या नगदी पिकांचा समावेश होता.शासनाने व कृषी खात्याने लागवडनंतर उपरोक्त पिकांचे संरक्षण म्हणून पिकविमा काढण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे शेतकºयांनी पीकविमा उतरवला होता, तसेच बँकांनीदेखील कर्जदार शेतकºयांना कर्ज हप्ता पीक विमा रक्कमेसह भरून घेतला होता. सर्व पिके जोमात असताना सतत दोन महिने अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्व पिके वाया गेली होती. नियमानुसार शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरले होते. नुकसानीनंतर कृषी व महसूल खाते तसेच विमा कंपन्यांने रीतसर पंचनामेही केले होते. मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा व इतर तालुक्यांतील डाळिंंब, कांदा व इतर फळ उत्पादक शेतकºयांनी पीकविमा प्रतिहेक्टरी ठरवून दिल्याप्रमाणे रक्कमेचा रोख भरणा केलेला होता. परंतु पीकविम्याचे नियमित हप्ते भरूनही विमा कंपन्यांनी शेतकºयांना नुकसानभरपाईची मदत न करता वाºयावर सोडून दिले आहे. काही ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हवामान खात्याच्या चुकीच्या नोंदी दाखवत त्या तारखांना पाऊस कमी पडला होता, असे दाखवून शेतकºयांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पीकविमाधारक शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, प्रा. के. एन. आहिरे, देवा पाटील, शेखर पवार, कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाठ, उदय राहुडे, दुर्गेश देवरे आदींनी केली आहे.शासनातर्फे पीकविमा भरपाई तत्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार धान्य उत्पादक शेतकºयांना पीकविमा भरपाई अदा करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघा १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. शेतकºयांना येणाºया हंगामाच्या आत जरपीकविमा भरपाई मिळाली तर पुढील हंगामासाठी थोडेफार भांडवल उपलब्ध होईल.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे मार्च महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामातील शेतमालाला बाजारपेठ मिळू शकली नाही. दर प्रचंड कोसळले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयाला मदतीचा हात देण्यासाठी तत्काळ पीकविमा भरपाई देणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMONEYपैसा