शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

कांदा भावात  घसरण सुरुच ; उत्पादकांवर चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:57 PM

बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे, तर सरासरी भावात ३०० रुपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनांतून झाली; परंतु बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५० रुपये कमाल भाव १९०५, तर सरासरी भावाची पातळी १६५० रुपये इतकी होती. सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रुपयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रुपयांच्या आत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

लासलगाव : बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे, तर सरासरी भावात ३०० रुपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनांतून झाली; परंतु बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५० रुपये कमाल भाव १९०५, तर सरासरी भावाची पातळी १६५० रुपये इतकी होती. सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात ३०० रुपयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत १२०० रु पयांची मोठी घसरण होत कांदा दोन हजार रुपयांच्या आत आल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील सप्ताहात कांद्याची आवक ८५ हजार ५४४ क्विंटल झाली होती, तर किमान भाव १००० तर कमाल भाव ३१५८ व सरासरी भाव २८५३ रुपये होते.  कोलंबो वगळता थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट वाढती आवक व गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यात लासलगावसह विविध बाजारपेठेत वेगाने होऊन कांदा भावात घसरण होत झाला.  मागील सप्ताहात मंगळवारच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६००, कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. मागील सप्ताहात दि. २३ जानेवारी रोजी १७,१६८ क्विंटल कांदा लिलावात किमान १५००, कमाल ३१५२ तर सरासरी भाव २८५१ रुपये होते. या सप्ताहात सोमवारी लिलावात किमान, कमाल व सरासरी भावात यावर्षी विक्रमी वेगाने घसरण होत १९,१५६ क्विंटल कांदा लिलावात किमान ९००, कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रुपये भाव जाहीर झाला. उत्पादनात वाढ; निर्यातीची गती मंदावली वणी : गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांबरोबरच नगर, पुणे, सोलापूर भागातील कांदा मोठ्या प्रमाणावर बाजार समित्यांमध्ये दाखल झाल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून, निर्यातमूल्याचाही परिणाम झाल्याने कांदा उत्पादक चिंतित झाले आहेत.लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक सुरू आहे. केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने किरकोळ बाजारातील वाढत्या कांदा दरावर नियंत्रण आणण्यासाठी किमान निर्यातमूल्य सातशे डॉलर प्रतिटन आकारणी केल्याने भारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग वाटू लागल्याने कांद्याची मागणी कमी झाल्याची माहिती निर्यातदार मनीष बोरा यांनी दिली.देशांतर्गत गुजरात, मध्य प्रदेशबरोबर महाराष्टÑातील  नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कांद्यानेही बाजार समित्यांमध्ये दमदार आगमन केले आहे. याचा एकत्रित परिणाम होत आवक जास्त आणि मागणी कमी या सूत्रानुसार झाला आहे.  देशाची गरज भागवून कांदा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे; मात्र निर्यातमूल्यामुळे परदेशी ग्राहकांना भारतीय कांदा दरवाढीमुळे परवडत नसल्याने स्थानिक खरेदीदार व निर्यातदारांनी कांदा खरेदीबाबत हात आखडता घेतला आहे.  कांदा निर्यातीसाठीची प्रक्रि या पूर्ण करताना लेटर आॅफ क्रेडिट (एलसी) याची पूर्तता करावी लागते; मात्र  क्लिष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने निर्यातदाराची मनोभूमिका निर्यात करण्याची राहिली नसल्याने केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती बोरा यांनी दिली.  गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सद्यस्थितीत कांद्याचे दर सुमारे हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादकांच्या पदरी निराशा पडल्याने सकारात्मक धोरण सरकारने राबवावे, अशी मागणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील यांनी केली आहे. कांदा एकमेव उत्पादनाचे साधनखामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची शेती तोट्यात येऊ लागल्याने शेतकºयाने डाळिंबाची झाडे उपटून टाकली.  डाळिंबाची शेती कमी होऊन कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली. आता शेतकºयांकडे कांदा एकमेव उत्पादनाचे साधन राहिले तेव्हा शेतकरी कांदा पिकाकडे वळला. हमखास पैसे देणारे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळत नव्हता, त्यामुळे कांद्याचे पीक तोट्यात येत असे. परंतु गेल्या वर्षी उन्हाळी काढणीच्या हंगामात कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नव्हता. तेव्हा काही शेतकºयांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला.सप्टेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याच्या भावात वाढ झाली. याचा फायदा मोठ्या शेतकºयांना झाला. तेव्हा हा उन्हाळी कांदा साधारण तीन ते चार हजारांच्या आसपास विकला जाऊ लागल्याने शेतकºयाने लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांद्याचे भाव स्थिर होते. वातावरणात सतत बदल होत गेला तरी कांद्यावर महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक चांगले आले आहे.  कांद्याचा जास्त भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ८५० डॉलर केले तरीही कांद्याचे भाव स्थिर होते; परंतु भाव कमी होऊ लागल्याने निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी केले. तरीही कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड