शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास २१२१ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:06 IST

उमराणे : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( खारिपाडा ) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या रामेश्वर कृषी बाजारात भाऊसाहेब ...

ठळक मुद्देउमराणे : रामेश्वर कृषी बाजारात मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी विक्रमी आवक

उमराणे : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( खारिपाडा ) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या रामेश्वर कृषी बाजारात भाऊसाहेब पांडुरंग सूर्यवंशी या शेतकऱ्याने लिलावासाठी आणलेल्या मुहूर्ताच्या बैलगाडीतील उन्हाळ ( गावठी) कांद्यास गजानन आडतचे संचालक संजय देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत २१२१ रुपये दराने कांदामाल खरेदी केला.तत्पूर्वी व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या हस्ते नवीन बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजारात उमराणे गावापासून अवघ्या दोन ते तीन कि.मी.अंतरावर असलेल्या महात्मा फुलेनगर (खारीपाडा ) येथे खाजगी मार्केटसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने रामेश्वर कृषी बाजारचे संचालक पुंडलिक देवरे व श्रीपाल ओस्तवाल यांनी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व माल विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशस्त जागेत खाजगी रामेश्वर कृषी बाजाराची निर्मिती केली. त्या अनुषंगाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाप्रसंगी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, पं.स.सदस्य धर्मा देवरे, फुलेनगरच्या सरपंच सविता गांगुर्डे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर जाधव, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, पंकज ओस्तवाल, दिलीप नाना देवरे आदींसह कांदा खरेदीदार व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वीस हजार क्विंटल कांदा आवकलिलावासाठी पहिल्याच दिवशी सहाशे ते सातशे ट्रॅक्टर, शंभर पिकअप व पाच बैलगाडीतून सुमारे वीस हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून लाल कांद्यास कमीत कमी ३०० रुपये,जास्तीत जास्त ९०० रुपये तर सरासरी ७०० रुपये तसेच उन्हाळी कांद्यास कमीत कमी ५०० रुपये,जास्तीत जास्त २१२१ रुपये तर सरासरी ८०० रुपये असा बाजारभाव होता. दरम्यान उमराणे येथे स्व निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या बाजार समितीच्या तुलनेत खाजगी रामेश्वर कृषी बाजारात किती आवक होते, किती व्यापारी सहभागी होतात व काय बाजारभाव निघतो याबाबत उमराणेसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता लागून होती.फुलेनगर येथील खाजगी रामेश्वर कृषी बाजारात मुहूर्ताच्या बैलगाडीचे पूजन करताना व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी व व्यापारी, तसेच दुसऱ्या छायाचित्रात बाजार आवारात कांदा विक्रीसाठी झालेली गर्दी. (१३ उमराणे १/२)

टॅग्स :onionकांदाMarketबाजार