शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शरदचंद्र पवार बाजरसमितीत कांदा लिलाव सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:32 IST

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा बाजारात कांदा लिलाव सुरळीत होत असून सोमवारी कांद्याला 5400 रुपये क्विंटल दर मिळाला. कांदा दर नियंत्रित राहावे यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर काहीसे निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव नियमीत सुरू असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

ठळक मुद्देकांद्याला कमाल 5400 रुपये दर

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा बाजारात कांदा लिलाव सुरळीत होत असून सोमवारी कांद्याला 5400 रुपये क्विंटल दर मिळाला. कांदा दर नियंत्रित राहावे यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर काहीसे निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव नियमीत सुरू असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना कांदा खरेदीसाठी खिशाला आर्थिक व्यवस्था करावी लागत आहे. कांदा दर वाढल्याने काही साठेबाजांनी कांद्याची साठवणूक करून कांदा मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने अशा साठे बहाद्दरांना दणका देण्यासाठीव कांदाचे दर नियत्रांत रहावे म्हणून केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले आहे. आडत्यांना 25 क्विंटल, तर व्यापाऱ्यांना 2 क्विंटल कांदा अशी मर्यादा निश्चित केली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, मनमाड उमराणे बाजारसमितीतील व्यापाऱ्यांनी काल लिलाव बंद केले होते. मात्र नाशिकमधील नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा मार्केट येथे कांदा लिलाव सुरळीत सुरू होते. बाजरसमितीत सिन्नर, शिंदे,पळसे, वावी, पांगरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा येथून कांदा आवक होत असते. सोमवारी प्रमाणे शरदचंद्र मार्केटमध्ये दुपारी नियमितपणे लिलाव पार पडले.सोमवारी जवळपास 470 क्विंटल कांदा आवक झाली त्यात सरासरी 4500, किमान 2200 तर कमाल 5400 रूपये पर्यंत बाजारभाव मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी अनेक बाजारसमितीत आडतदार व व्यापारी यांनी कांदा लिलाव बंद ठेवत शासनाच्या कांदा साठवणूक निर्बंधाच्या विरोधात लिलाव बंद केले होते. बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत व त्यांची धावपळ टाळण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार बाजार समितीत कांदा लिलाव सुरळीत ठेवले होते. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी