शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:52 IST

नाशिक : प्राप्तिकर खात्याच्या विविध पथकांकडून लासलगावसह पिंपळगाव बसंवत येथील कांदा व्यापाऱ्यांकडील व्यवहाराची तपासणी गुरूवारी (दि.१५) सलग दुसºया दिवशीही सुरू राहिल्याने व व्यापारी वर्ग लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव येथील कांदा लिलाव बंद राहिले. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत लिलाव होऊन कांदा दरात ४८० रुपयांनी घसरण झाली तर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांतही तीच स्थिती दिसून आली. दरम्यान, या कारवाईमुळे दर कमी होण्याची भिती शेतकºयांमध्ये निर्माण झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : प्राप्तिकरची कारवाई दुसºया दिवशीही सुरूच

नाशिक : प्राप्तिकर खात्याच्या विविध पथकांकडून लासलगावसह पिंपळगाव बसंवत येथील कांदा व्यापाऱ्यांकडील व्यवहाराची तपासणी गुरूवारी (दि.१५) सलग दुसºया दिवशीही सुरू राहिल्याने व व्यापारी वर्ग लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव येथील कांदा लिलाव बंद राहिले. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत लिलाव होऊन कांदा दरात ४८० रुपयांनी घसरण झाली तर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांतही तीच स्थिती दिसून आली. दरम्यान, या कारवाईमुळे दर कमी होण्याची भिती शेतकºयांमध्ये निर्माण झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.बुधवारी (दि.१४) प्राप्तिकर विभागाकडून लासलगाव येथील १० तर पिंपळगाव बसवंत येथील एका व्यापाºयाच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू करण्यात आल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली होती. सलग दुसºया दिवशीही ही तपासणी सुरूच राहिल्याने कांदा व्यापाºयांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय बाजार समितीला कळविला. त्यामुळे समिती आवारात विक्रीसाठी आणलेला कांदा शेतकºयांना परत माघारी घेऊन जावा लागला. लासलगाव बाजार समितीने काही कांद्याची वाहने विंचुर येथील कांदा उपआवारावर विक्र ीस नेण्याचे आवाहन केले. प्राप्तिकर विभागाच्या तपासणीमुळे कांदा लिलाव बंद राहिल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघर्ष समितीसह शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने तपासणी सुरू केल्याने कांदा लिलाव ठप्प झाले आहे . कांदा विभागातील व्यापारी वर्गाने दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकणार नसल्याचे बाजार समितीस कळविल्याने लिलावाचे कामकाज बंद ठेवावे लागले. लवकरच बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापाºयांमध्ये बैठक घेऊन हे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे थेट परिणाम हा कांद्याचा बाजार भावावर होतो. कांदा उत्पादकांना याचा थेट फटका बसत असल्याने याबाबत केंद्र सरकारजवळ पाठपुरावा केला जाणार आहे.- सुवर्णाताई जगताप, सभापती ,लासलगाव बाजार समिती

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा