शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, धान्य शेतमालाचे लिलाव आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

येथील बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य व्यापाऱ्यांवर बँकेतून पैसे काढल्यानंतर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारीवर्गाकडून लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव मंगळवारी (दि. २४) बंद ठेवून निषेध पाळण्यात येणार आहे.

लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य व्यापाऱ्यांवर बँकेतून पैसे काढल्यानंतर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारीवर्गाकडून लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेतमालाचे लिलाव मंगळवारी (दि. २४) बंद ठेवून निषेध पाळण्यात येणार आहे.  लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावर शेतमाल विक्री झाल्यानंतर शेतकºयांना त्यांच्या मालाचे पैसे अदा करण्यासाठी येथील व्यापारी बँकेतून रोख रकमा काढतात. त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडील रकमा चोरून नेण्याच्या घटना काही दिवसांपासून वारंवार लासलगाव येथे घडत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव व विंचूर येथील लासलगाव पोलीस ठाणे व बाजार समितीकडे सदर घटनेचा लवकरात लवकर तपास लावून संबंधित व्यापाºयांना न्याय मिळवून द्यावा, असे लेखी निवेदन सादर केले आहे. वारंवार होणाºया चोरीच्या घटनांचा तपास लवकरात लवकर न लागल्यास यापुढे लिलावाचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा दिला आहे.वरील वारंवार घडणाºया घटनांवर विचारविनिमय करण्यासाठी बाजार समितीने मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता तातडीने पोलीस प्रशासन, बँकांचे अधिकारी व व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक लासलगाव मुख्य कार्यालयात आयोजित केली असल्याचे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.फेब्रुवारी २०१८ मध्ये विंचूर येथील धान्य व्यापारी ईश्वर ढवण यांच्या कारच्या काचा फोडून गाडीतील रोख रकमेची बॅग चोरट्यांनी लंपास केली. त्याचा तपास अद्यापपावेतो लागलेला नसताना पुन्हा २३ एप्रिल रोजी कांदा व्यापारी राहुल सानप यांनी आपल्या खात्यातून ९ लाख रोख रक्कम काढून गाडीत बसत असताना अज्ञात इसमांकडून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून त्यांच्याकडील रोख रकमेची बॅग लंपास केली आहे.

टॅग्स :onionकांदा