शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराची लाच घेताना पोलीस ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:07 IST

रिक्षावर कारवाई टाळण्यासाठी चालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित पोलीस शिपाई दिनेश शेडजी चव्हाण (बक्कल- २४८०) यास रंगेहाथ ताब्यात घेतले.

नाशिक : रिक्षावर कारवाई टाळण्यासाठी चालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित पोलीस शिपाई दिनेश शेडजी चव्हाण (बक्कल- २४८०) यास रंगेहाथ ताब्यात घेतले. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातच सदर प्रकार घडला.याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित लाचखोर दिनेश चव्हाण (रा. नाशिक) भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्याने रिक्षा (एमएच १५, एफयू २७६०)वर कारवाई करत जप्त केली होती. रिक्षाचालकाने सदरची रिक्षा सोडविण्यासाठी प्रयत्न केले असता, चव्हाण याने रिक्षाचालकाकडे एक हजार रु पयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.रिक्षाचालकाने यासंदर्भात तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. त्यानुसार पथकाने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. यावेळी येथील एका झाडाजवळ चव्हाण याने रिक्षाचालकाकडून एक हजाराची रक्कम स्वीकारली असता पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक