शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बिलवाडी शाळेचे एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:11 IST

अभोणा : कळवण तालुक्यातील बिलवाडी अतिदुर्गम दोन पाड्यांचे गाव. गावातील बहुतेक पालकांचे वास्तव्य शेतात. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव.. त्यामुळे गावात कोणतेही नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी अगदी कमी वेगाचे नेटवर्क...

ठळक मुद्देशाळा बंद शिक्षण सुरू : अतिदुर्गम पाड्यात विद्यार्थ्यांना आॅनलाइन धडे

लोकमत न्यूज नेटवर्कअभोणा : कळवण तालुक्यातील बिलवाडी अतिदुर्गम दोन पाड्यांचे गाव. गावातील बहुतेक पालकांचे वास्तव्य शेतात. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव.. त्यामुळे गावात कोणतेही नेटवर्क नाही, तर काही ठिकाणी अगदी कमी वेगाचे नेटवर्क...कोरोना महामारीत ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ ही अभ्यासमाला जिल्ह्यात सुरू करण्यात आली. पालकांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केलेत. परंतु पालकांना नेटवर्क शोधण्यासाठी गावभर फिरावे लागत असे, नाहीतर टेकड्यांवर जाऊन शिक्षकांनी पाठविलेली अभ्यासमाला डाउनलोड करण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. कधीतरी नेटवर्क मध्ये आल्यावर अभ्यासमाला व इतर आॅनलाइन शैक्षणिक साहित्य मिळायचे, अशा परिस्थितीत शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे ही तळमळ काही शांत बसू देत नव्हती. त्यातूनच शिक्षकांनी विस्तार अधिकारी संजय चव्हाण यांच्या मार्गदशर्नाखाली येथे एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.गावातील स्मार्ट टेलिव्हिजन व मोबाइल असलेल्या पालकांची यादी तयार केली. उपशिक्षक रामचंद्र वाडिले यांनी एक पेनड्राइव्ह त्या स्मार्ट टेलिव्हिजन व स्मार्ट मोबाइलला जोडणी करून आॅफलाइन अध्यापन व अध्ययन करता येते याचे प्रात्यक्षिक दाखविले ते पाहून शाळेचे मुख्याध्यापक रणधीर बस्ते यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली. सदर उपक्रमाचे प्रात्यक्षिक परत करून घेतले. यावेळी उपस्थिताना पेन ड्रॉइव्ह दान करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.पालक स्वत: पेनड्राइव्ह खरेदी करून पाल्यासाठी कोरोनाकाळात आत्मनिर्भरतेने शिक्षण सुरू करू लागले आहेत. उपक्रमासाठी चिंचपाडा (जा) बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.डी. चव्हाण, केंद्रप्रमुख श्रीमती एस.के. गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले .शैक्षणिक पाठशिक्षकांनी वर्गाचा अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक पाठाचे सादरीकरणाचा व्हिडिओ, स्वाध्याय, विविध उपक्रम डाऊनलोड करून घेतले. शिक्षणाचे नियोजन केले. ्यका विद्यार्थ्याकडे दोन दिवस एक पेन ड्राइव्ह स्मार्ट टेलिव्हिजन व फोनला जोडणी करून विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅफलाइन आत्मनिर्भरतेने शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण