शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वन स्टेट वन ई-चलान : वाहतूक पोलिसांकडून राज्यस्तरावर ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’ विकसीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:13 IST

‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट आॅनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल, असा आशावाद शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे ‘वन स्टेट वन ई-चलान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’देखील विकसीत पोलीस प्रशासनाने हायटेक होत स्मार्ट पर्याय शोधला

नाशिक : वाहतूकीचा नियम पायदळी तुडविल्यास वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. यावेळी वाहतूक पोलीस व वाहनचालक दोघांचाही वेळ वाया जातो आणि वाद होऊन खटके उडतात. हे टाळण्यासाठी संपुर्ण राज्यात ‘वन स्टेट वन ई-चलान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’देखील विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाहनचालक कोणत्याही शहरातून दंडाची रक्कम थेट आॅनलाइन अदा करू शकतो.बेशिस्त चालकांना शिस्त लागावी, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक शाखेकडून बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईदरम्यान वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये वादविवादही अनेकदा घडतो. वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हायटेक होत स्मार्ट पर्याय शोधला असून ‘ई-चलान’ पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार बेशिस्त वाहनचालकांनी ज्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल त्याचा उल्लेख करून त्या वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेची पावती थेट घरपोच पाठविली जाते. मात्र अनेकदा वाहनाचालकांच्या पत्त्यांमधील त्रुटींमुळे किंवा वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दंडाची रक्कम भरली जात नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलीस प्रशासनाने त्याच्यापुढे एक पाऊल टाकले आहे. वन ई-चलानप्रमाणे वन अ‍ॅप राज्यस्तरावर विकसीत करण्यात आले आहे. ‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट आॅनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल, असा आशावाद शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी व्यक्त केला आहे.नाशिक : वाहतूकीचा नियम पायदळी तुडविल्यास वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. यावेळी वाहतूक पोलीस व वाहनचालक दोघांचाही वेळ वाया जातो आणि वाद होऊन खटके उडतात. हे टाळण्यासाठी संपुर्ण राज्यात ‘वन स्टेट वन ई-चलान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’देखील विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाहनचालक कोणत्याही शहरातून दंडाची रक्कम थेट आॅनलाइन अदा करू शकतो.बेशिस्त चालकांना शिस्त लागावी, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक शाखेकडून बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईदरम्यान वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये वादविवादही अनेकदा घडतो. वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हायटेक होत स्मार्ट पर्याय शोधला असून ‘ई-चलान’ पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार बेशिस्त वाहनचालकांनी ज्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल त्याचा उल्लेख करून त्या वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेची पावती थेट घरपोच पाठविली जाते. मात्र अनेकदा वाहनाचालकांच्या पत्त्यांमधील त्रुटींमुळे किंवा वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दंडाची रक्कम भरली जात नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलीस प्रशासनाने त्याच्यापुढे एक पाऊल टाकले आहे. वन ई-चलानप्रमाणे वन अ‍ॅप राज्यस्तरावर विकसीत करण्यात आले आहे. ‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट आॅनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल, असा आशावाद शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस