ओझरटाऊनशिप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर एच ए एल गमेनगेट उड्डान पुलावर अल्टो कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात कार मधील महिला गंभीर जखमी तर एका मुलीसह दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमीना पोलिसांनी ताबडतोब रूग्णालयात दाखल केलेमंगळवारी (दि.११) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अल्टो कार (एम एच १५ जी एल ६३९६) पिंपळगांवकडून नाशिककडे जात असताना मेनगेट समोरील उड्डाण पुलावर कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली व पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात जयश्री किरण बाणराव या गंभीर जखमी झाल्या तर किरण बाणराव यांच्यासह त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाले.त्यांना गस्तीवर असलेले महामार्ग पोलिस हवालदार अरूण शिंदे ,संजय गुंजाळ, राठोड, मोरे, भालेराव यांनी एच ए एल रूग्णालयात दाखल करून लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. अधिक तपास ओझर पोलिस करीत आहेत.
कार दुभाजकावर आदळल्याने एक गंभीर तर दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:04 IST
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर एच ए एल गमेनगेट उड्डान पुलावर अल्टो कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात कार मधील महिला गंभीर जखमी तर एका मुलीसह दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमीना पोलिसांनी ताबडतोब रूग्णालयात दाखल केले
कार दुभाजकावर आदळल्याने एक गंभीर तर दोन जण जखमी
ठळक मुद्देकार मधील महिला गंभीर जखमी तर एका मुलीसह दोन जण किरकोळ जखमी