शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मांजा अडकून गाल चिरल्याने एकजण गंभीर जखमी, सुदैवाने गळा वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 20:28 IST

खोलवर जखम; उपचारासाठी सिन्नरला हलवले

शैलेश कर्पेसिन्नर (जि नाशिक) : तालुक्याच्या पूर्व वावी येथे पतंगाचा मांजा अडकून दुचाकीस्वाराचा गाल चिरल्याची घटना घडली. सुदैवाने मांजा गळ्यात न अडकल्याने मोठी आपत्ती टळली असली तरी त्याला गंभीर जखम झाली असून दहा टाके पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. पूर्व भागातील कहांडळवाडी येथून दगु नाना वाघ(५०) हे शेतकरी धान्य दळण दळण्यासाठी दुचाकीहून वावीकडे येत होते.

वावी गावात प्रवेश करताच नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळ पतंगाचा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर अडकला. वाघ हे दुचाकीवर असल्याने मांजा ओढला गेला. या या घटनेत त्यांच्या गालाच्या वर आणि कानाजवळ गंभीर दुखापत झाली. डाव्या बाजूला मोठी गंभीर जखम झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या वाघ यांना वावीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तथापि जखम गंभीर आणि खोल असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सिन्नरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला तातडीने बोलावून वाघ यांची रवानगी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. वाघ यांच्यावर सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले एक सेंटीमीटर खोल व पाच सेंटीमीटर लांबीची वाघ यांच्या गालावर मोठी जखम झाली. त्यांच्यावर सुमारे दहा टक्के घालण्यात आले वाघ यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

वाघ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, सिन्नर शहर व तालुक्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. पतंगाच्या मागे बेफान होऊन धावणारी मुले आणि पतंग कापाकापी ची रस्सीखेच आणि ओरडण्याचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता.

टॅग्स :Nashikनाशिक