पंधरा मुलांसाठी एक किलो खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:52 PM2020-03-17T13:52:19+5:302020-03-17T13:52:41+5:30

पिंपळगाव बसवंत :- मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार ...

 One kilogram for fifteen children | पंधरा मुलांसाठी एक किलो खिचडी

आहेरगाव येथील अंगणवाडीत चौकशी करताना माजी सभापती व पंचायत समतिी सदस्य पंडित आहेर सरपंच पोलिस पाटील व महिला वर्ग.

Next
ठळक मुद्दे नागरिकांचा संताप :आहेरगाव च्या अंगणवाडीतीलप्रकार.

पिंपळगाव बसवंत :-
मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी पोटभर पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून अंगणवाडी व शालेय पोषण आहार दिला जातो परंतु खाणारे असंख्य पण मूठभर आहार शिजवून अंगणवाडी सेविकाकडून मापात पाप करून मुलांच्या पोटाची खळगी रिकामी ठेवण्याचे काम सुरु आहे .आहेरगाव येथील अंगणवाडी पोषण आहार वितरणावेळी १५मुलांना फक्त एक किलो पोषण आहार शिजवून दिला जात असल्याचे पंचायत समिती सदस्य पंडित आहेर यांनी केलेल्या चौकशीने समोर आले आहे आहे. तपासी अधिकारी स्वप्नाली कागदे यांच्या दुर्लक्षित मुळे हे प्रकार घडत असल्याचीतक्रारकरण्यातआली.आहेरगाव येथील अंगणवाडी सेविकांची महिलांना अरेरावी नेहमी चर्चेचा विषय बनला आहे.
येथील महिलांनी नेहमीत पोषण आहार मिळतो की नाही यासंदर्भात पंचायत समिती सदस्य व माजी सभापती पंडित आहेर यांना बोलवून अंगणवाडीची चौकशी केली असता अंगणवाडीत कोणताही पोषण आहार फलक लावलेला नाही, गेल्या तीन चार मिहन्याचे रजिस्टर भरलेले नाही व उपस्थित१५मुलांसाठी केवळ एक किलो पोषण आहार शिजवलेला होता. तसेच रोज दिला जाणारा नाश्ता देखील दिला जात नाही , येथील विभागाचे दप्तर तपास व सुपरवायझर करणाऱ्याचे देखील दुर्लक्ष असल्याचीतक्रारयावेळीकरण्यातआलीआहे. या अंगणवाडीच्या सेविकेची तात्काळ बदली करावी अशी मागणी यावेळी गावकº्यांनी े केली . यावेळी सविता गांगुर्डे ,स्वाती जाधव ,दीपा गिरडकर, पूजा जाधव, विद्या देशमुख ,अश्विनी कडाळे ,भारती जाधव ,स्वाती गवळी ,पूजा पगारे ,शीतल जाधव ,वैशू कोकाटे , शामिनी शेख ,मुस्कान शेख ,पुजा दाते ,प्रमिला बागुल ,वंदना जाधव ,अर्चना जाधव ,स्वाती कापसे ,आशा भोईर ,कविता जाधव आदी महिलांसह सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते.





पोषण आहार घेण्यासाठी गेल्यावर येथील अंगणवाडी सेविका अरेरावी करत असते महिलांनाच नव्हे तर गावातील सरपंच, पोलिस पाटील व सदस्यांना देखील आरेरावी करते मुलांना देखील पुरेसा पोषण आहार देत नाही त्यामुळे या महिलेची बदली करावी जेणेकरून गावात याप्रकरणी पुन्हा वाद होणार नाही याची बाल विकास अधिकाऱ्यांनीदखल घ्यावी.
-सविता गांगुर्डे,महिला मंडळ अध्यक्ष,आहेरगाव


 

Web Title:  One kilogram for fifteen children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.