राहुड घाटात तिहेरी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 03:38 PM2019-09-03T15:38:37+5:302019-09-03T15:39:00+5:30

चांदवड - तालुक्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तिहेरी अपघातात एक जण ठार झाला आहे.

One killed in triple accident in Rahu Ghat | राहुड घाटात तिहेरी अपघातात एक ठार

राहुड घाटात तिहेरी अपघातात एक ठार

Next

चांदवड - तालुक्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तिहेरी अपघातात एक जण ठार झाला आहे. कांद्याने भरलेला ट्रक क्रमांक सी.जी.०७ डी.सी. २४५१ हा चांदवडकडून मालेगावकडे जाताना पुढे जाणाऱ्या डाळींब भरलेल्या पिकअप क्रमांक एम.एच.१५-५५२९ हीस धडक दिल्याने पिकअप बाजुला पलटी झाला. या ट्रकने पुढे जाणाºया वळण रस्त्यावरील गॅस टॅकर क्रंमाक एम.एच. ०४ -टी.के.३०२४ यास धडक दिल्याने ट्रकमधील क्लिनर दीपक कुमार मंडईत हा जागीच ठार झाला. चालक संतोषकुमार मंडईत याने ट्रकमधुन उडी मारल्याने किरकोळ जखमी झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास जगताप,नाईक बागुल आदिनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले तर या तिहेरी अपघातामुळे आग्रारोडवरील मालेगावकडे जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. वाहतुक सुरळीत करण्यासाठी चांदवडचे पोलीस व सोमा टोल कं पनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed in triple accident in Rahu Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक