लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु असून, बुधवारी वाळू तस्करीने आदिवासी मजुराचा बळी घेतल्याची घटना डोंगरेज परिसरात घडली. पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने वाळू तस्करी करणारा टॅक्ट्रर पलटी होऊन त्याच्यात बावीस वर्षीय मजूर जागीच ठार झाला तर तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी गण्या नामक वाळू तस्कर विरु ध्द गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील डोंगरेज परिसरात कान्हेरी नदीतून अवैध वाळू उपसा करून सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होवून या अपघातात वाळू उपसा करणाऱ्या तरु णापैकी एकजण ट्रॉलीखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तिघे जखमी जखमी असून त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंगरेज ते रानमळा दरम्यान अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर (एमएच ४१ डी ४२) रस्त्याच्या कडेला पलटल्याने वाळूवर बसलेल्यापैकी सोमनाथ माळी हा मजूर वाळूखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. काळू उगलाल पवार, नितीन दगा माळी, रोहिदास माळी, राजेंद्र पवार हे तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रॅक्टरमालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट करीत आहेत.
टॅ्रक्टरखाली सापडून एक ठार
By admin | Updated: June 1, 2017 01:34 IST