शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

गोंदे दुमाला येथील अपघातात एक ठार , सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:37 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हिटीसी फाट्याजवळी झालेल्या अपघातात एक जण जागीच जण ठार तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.

ठळक मुद्देनाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हिटीसी फाट्याजवळ मुंबईहून - नाशिककडे जात असतांना झायलो गाडी क्र मांक (एम.एच.०२. डब्लू. ए. ७३९३) या गाडीचे टायर पंचर झाल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पंचर झालेले टायर काढण्याचे का

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हिटीसी फाट्याजवळी झालेल्या अपघातात एक जण जागीच जण ठार तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.अशातच अचानक मुंबईहून -नाशिककडे मागुन भरधाव वेगाने येणा-या कंटेनर क्र मांक (एम.एच. ४३.बी.पी.१४८५) या कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याला उभी असलेल्या झायलो गाडीला जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात ास जबर मार लागल्यामुळेझायलो गाडीचा चालक राजभार झब्बार (वय २८, कांदिवली, मुंबई.) हा जागीच ठार झाला.तर चंद्रशेखर लालधारी यादव.(वय३३. जोगेश्वरी,मुंबई), सुमनकुमार धनंजय झा.(वय २४, बोईसर, मुंबई), धर्मेद्रकुमार रामाशंकर गोळ (३०, कांदिवली, मुंबई) , पिंटू ओमप्रकाश सिंग (२५, कांदिवली, मुंबई) , ललितकुमार शिवप्रसाद पाल (वय २८), तर अन्य एकाचे नाव समजू शकले नाही.असे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.दरम्यान अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडिव-हे पोलिस स्टेशनला कळवले.यानंतर लगेचच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले.सदर फरार असलेल्या कंटेनरच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.