नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.ज्ञानेश्वर नरहरी गायकर (४१) रा. मालुंजे ता. इगतपुरी असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी वावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील मालुंजे येथील ज्ञानेश्वर गायकर व संदिप बंडु रायकर (३०) हे दोघे दुचाकीने (एम.एच.१५, बी. एच. ७५८७) संगमनेर येथे जात होते. रविवारी (दि.२०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोंदे शिवारातील समृध्द महामार्गाच्या कामाजवळील गतीरोधकावर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघातात गायकर हे मयत झाले असून संदीप हे जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. वावी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण अढांगळे, जी. के.आव्हाड हे करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:12 IST
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी
ठळक मुद्देअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार