शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे तिहेरी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 00:33 IST

देवळा : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ट्रॅक्टर, आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देदोघे भाऊ गंभीर जखमी; राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील घटना

देवळा : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ट्रॅक्टर, आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी (दि. २१) दुपारी २ वाजेच्या सुमारास देवळा - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोरून भावडबारी घाटाच्या दिशेने जाणारी दुचाकी (एमएच ४१ एएफ ५९५७) ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील राजेश भारत खैरनार (३०, रा. भाक्षी) हे जागीच ठार झाले, तर गणेश विजय पगारे (३०), सोमनाथ विजय पगारे (२५) दोघे रा. मुळाणे, ता. सटाणा हे गंभीर जखमी झाले.अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील शेतकरी व युवक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांची गंभीर परिस्थिती पाहून गणेश पगारे याला नाशिक येथे, तर सोमनाथ पगारे याला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेनंतर देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात याच ठिकाणी दुचाकी व इर्टिगा कार यांचा भीषण अपघात झाला होता. अपघातात दुचाकीस्वार रामेश्वर येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुले असा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दुर्गा हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यावर असलेले खड्डे यापूर्वी येथे झालेल्या अपघातांना कारणीभूत ठरले असून, अनेकांचा त्यात बळी गेला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू