शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

सटाण्याजवळ अपघातात एक ठार

By admin | Updated: June 13, 2014 00:22 IST

बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी अपघातात एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर नाशिकच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

सटाणा : देवळा रोडवरील मोरेनगर शिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी अपघातात एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर नाशिकच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त लेखापाल पोपटराव जिभाऊ पवार हे पत्नी सुशीला पवार (६३) व चि. करण नितीन पवार (७) हे सटाणा येथील लग्न आटोपून अवघ्या चार किमी. अंतरावर असलेल्या आपल्या घरी मोटारसायकलवरून परतत होते. रात्री राज्य महामार्गावर असलेल्या अंधारामुळे समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देऊन वाहन व वाहनचालक फरार झाले. यामुळे ते सापडू शकले नाहीत. सदरचा अपघात इतका भीषण होता की, पोपटराव जिभाऊ पवार हे जागीच गतप्राण झालेत, तर पत्नी सुशीला पवार व नातू करण पवार हेदेखील गंभीर झाले. अपघात झाल्यानंतर कोणाकडूनही मदत प्राप्त झाली नाही. समोरून बागलाण तहसीलदार यांचे वाहन थांबल्याने तलाठी गोसावी व सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत बगडाणे यांनी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोपटराव पवार हे जागीच ठार झाले होते, तर सुशीला पवार व करण पवार यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे तत्काळ रवाना करण्यात आले. गुरूवारी सकाळी ११ वाजता पोपटराव पवार यांच्यावर सटाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सटाणा पोलिसांत या अपघाताचा अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक भागवत जायभावे करीत आहेत. (वार्ताहर)निफाड फाटा बनला वाहतूक कोंडीचा फाटापिंपळगाव बसवंत : शहरातील वाहतुकीची कोंडी आता सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरत आहे. प्रशासन व पोलीस खाते दोघांकडूनही नागरिकांची दखल घेतली जात नाही.पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाट्यावरील वाढलेल्या अतिक्रमणांकडे प्रशासन का काणाडोळा करते. अतिक्रमणांमुळे वाहनांना वळणे घेण्यास अडचणी होत आहे. वाहतुकीची कोंडी काढण्यासाठी पोलीस कर्मचारी प्रयत्न करत आहे. परंतु अनेक कर्मचारी या ठिकाणी नसतात. शहराबाहेर वणी चौफुली निफाडरोडचा रानमळा आदि भागात वाहतुकीची कोंडी नसतानाही तेथे पोलीस कर्मचारी का उभे राहतात. हे प्रश्नचिन्ह असून, नागरिकांना पायी चालणेही मुश्कील बनले आहे. शिर्डी मार्गे येणारे जाणाऱ्या भाविकांना तर पर्यायीमार्ग नसल्याने शहरातूनच मार्ग काढावा लागतो. (वार्ताहर)त्यातच निफाड फाट्यावर रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहनचालकांनाही जीव मुठीत धरुनच निफाड फाटा पास करावा लागतो.निफाड फाट्यावरील अतिक्रमणे काढल्यास वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल. तसेच या ठिकाणी पोलीस चौकी बांधल्यास कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी उभे राहतील. मात्र याकडे प्रशासन व पोलीस कर्मचारी कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.