शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बसेसवर दगडफेक एक जखमी; महामार्ग जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:41 IST

जिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्ननाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक्का जाम आंदोलन केले.

ठळक मुद्देजिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्न बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद

नाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक्का जाम आंदोलन केले. लासलगाव येथे बस पेटवण्याचा प्रयत्न तसेच निफाडसह शहरात एकूण तीन ठिकाणी बसगाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तब्बल एक हजार बस गाड्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. जिल्ह्णात एकूण २१ ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी दिली.पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. शहरातील विविध उपनगरे व जिल्ह्णामधील काही गावांमध्ये घडलेल्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता दखलपात्र अनुचित घटना कुठेही घडल्याची नोंद प्रशासनाकडे नाही. आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसत होता. शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती जेमतेम होती. बाजारपेठाही बंद होत्या. विहितगाव येथे रिक्षावर भिरकावण्यात आलेल्या दगडामुळे एक युवक जखमी झाला. ही घटना वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी सीबीएस चौकाजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. तेथे तसेच नाशिकरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेण्यात आली. मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. बंद दरम्यान, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ठिकठिकाणी मोर्चेमहामार्गावर पोहोचलेल्या आंदोलकांनी चार तास चक्का जाम केला. अनेक ठिकाणी मोर्चा काढण्याचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात लासलगाव-मनमाड मार्गावर सकाळी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. निफाड येथेही बसचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. ठक्कर बाजार या बसस्थानकातही एक बस फोडण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय