शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:07 IST

नाशिक- विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा निर्णय होता, त्यास सुरू झालेल्या विरोधानंतर शासनाला देखील चुक उमगली असून त्यांनी अखेरीस अन्य आदेश काढून महाविद्यालयात आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलविण्यास मुभा दिला आहे.

ठळक मुद्देशासनाचे स्पष्टीकरण: संभ्रम दुर होण्याची शक्यता

नाशिक- विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा निर्णय होता, त्यास सुरू झालेल्या विरोधानंतर शासनाला देखील चुक उमगली असून त्यांनी अखेरीस अन्य आदेश काढून महाविद्यालयात आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलविण्यास मुभा दिला आहे.सोमवारी (दि.२१) कार्यसन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून यापूर्वीच्या १८ सप्टेंबरच्या आदेशाला अनुषंगून स्पष्टीकरण देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात गरजेनुसारपरीक्षेसाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आवश्यक असले तरी ही उपस्थिती आॅनलाईन किंवा प्रत्यक्ष जशी शक्य आहे, तशी उपस्थिती असावी. तसेच गरजेनुसार उपस्थिती असावी असेही नमूद करण्यात आले आहे.राज्यााचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत रविवारी (दि.२०) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी मुक्त विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. महाविद्यालयांनी अंतिम विषयाच्यापरीक्षा घेण्याची तयारी सुरू केल्यानंतर शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचे आदेश राज्यशासनाने जारी केले. त्या अनुषंघाने सर्व विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांनी कर्मचा-यांना शंभर टक्के शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती राहावी यासाठी शासनाच्या आदेशाच्या आधारे परिपत्रके काढली होती. मात्र, ठिकठिकाणी प्राध्यापक संघटनांनी विरोध सुरू केला होता. मुंबईसह अनेक ठिकाणी अद्याप प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत.तसेच नाशिक, पुणे आणि अन्यही ठिकाणी कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात शंभर टक्के उपस्थितीच्या आदेशामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.उदय सामंत यांना यासंदर्भात रविवारी विचारणा केल्यानंतर शासनाने शंभर टक्के उपस्थितीचा आदेश हा केवळ आधार म्हणून घेतला पाहिजे आणि आवश्यकतेनुसार कुलगुरूंनी शिक्षक- शिक्षकेतरांना बोलविले पाहिजे असेसांगितले. तथापि, शासनाच्या आदेशातच शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचा उल्लेख होता. यासंदर्भातील माहिती लक्षात आल्यानंतर सामंत यांनी तातडीने सुधारीत आदेश काढून गरजेनुसार शिक्षक- शिक्षकेतरांना बोलविण्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा