शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

दारूची बाटली दिली नाही म्हणून एकाचा झटापटीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 23:00 IST

सायखेडा : दारूची नशा काय करेल याचा नेम नाही. निफाड तालुक्यातील शिंगवे येथे दोन मद्यपी एकत्र आले. दिवसभर मनसोक्त मद्यपान झाले. सायंकाळी पुन्हा दारू आणून दे, असे म्हणत दोघांत झटापट झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देशिंगवेची घटना : पोलिसांकडून आरोपीस अटक

सायखेडा : दारूची नशा काय करेल याचा नेम नाही. निफाड तालुक्यातील शिंगवे येथे दोन मद्यपी एकत्र आले. दिवसभर मनसोक्त मद्यपान झाले. सायंकाळी पुन्हा दारू आणून दे, असे म्हणत दोघांत झटापट झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सविस्तर वृत्त असे की, शिंगवे मारुती मंदिराच्या पाठीमागे सायंकाळी ५ ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिलीप निवृत्ती पवार आणि दत्तू अष्टेकर दोघे दारू पीत होते. दारू संपली आणि दिलीप पवार यांनी मला दारू आणून दे, असा आग्रह दत्तूकडे धरला. दत्तू दारू आणत नसल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात दिलीपने अचानक लाथ मारल्याने दत्तू खाली पडला.

डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सायखेडा पोलिसांना समजताच सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी दिलीप पवार याला ताब्यात घेतले. दत्तूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे पाठवण्यात आला.संशयित आरोपीला सायखेडा पोलीस स्टेशनला हजर करून जबाब घेतले असता त्याने आपण लाथ मारल्यामुळे दत्तू खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याची कबुली दिली. सदर आरोपीवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी