शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

एक कोटीच्या कर्जाचे आमिष; चार लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:32 IST

नागरिकांच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना लबाडांनी अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांनाही लक्ष्य केले आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशाच लबाडीचा बळी ठरला असून, त्याला गायीचे पशुपालन करण्यासाठी शासकीय योजनेतून एक कोटीचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून टोळीने चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : नागरिकांच्या फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना लबाडांनी अल्पभूधारक शेतकरी आणि पशुपालकांनाही लक्ष्य केले आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशाच लबाडीचा बळी ठरला असून, त्याला गायीचे पशुपालन करण्यासाठी शासकीय योजनेतून एक कोटीचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून टोळीने चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.निफाड तालुक्यातील उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अजिंक्य जयवंत खापरे (२९) यांची चार लाख रुपयांची फसवणूक झाली. खापरे यांना संशयित आरोपी मुंबई नाका येथील व्ही. बिल्डिंगमधील एम्स अ‍ॅग्रो परिवार कंपनीचे संचालक महेंद्र दौलत खांदवे, शीतल महेंद्र खांदवे यांनी जितेंद्र पांडुरंग पाटील, संतोष कणसे, रामकृष्ण अभंग व सुवर्णा माजगावकर यांनी संगनमत करून अल्पभूधारक शेतकरी अजिंक्य खापरे यांना शासनाकडून गीर गायीचे पालन करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे व या पशुपालन व्यवसायातून उत्पादित होणारा माल वितरित करून त्यात ५० टक्के भागीदार करण्याचे आमिष दाखवून खापरे यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांच्याकडून एनएएफटीद्वारे चार लाख रुपयेही घेतले. परंतु, पैसे घेऊनही कर्ज मिळून न दिल्याने अजिंक्य खापरे यांनी एम्स अ‍ॅग्रो परिवारच्या संचालकांविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी संबंधित संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी