शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

बनावट नोट प्रकरणातील एक जण लष्कर सोडून आलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 00:33 IST

सुरगाणा तालुक्यात दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील एक जण लष्करातील नोकरी सोडून आला असल्याचे समजते. साधारण दीड महिन्यापूर्वी उंबरठाण परिसरातून गुजरात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या संशयितांना अटक केली होती. या संशयितांनी गुजरातमधील वापी, धरमपूर परिसरात बनावट नोटा चलनात आणल्या होत्या. या घटनेस दीड महिना उलटत नाही तोच दुसरे रॅकेट उघडकीस आले आहे. यात सात जणांना अटक झाली आहे.

ठळक मुद्देदुसरे रॅकेट उघडकीस : आतापर्यंत सात जणांना अटक

सुरगाणा : तालुक्यात दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील एक जण लष्करातील नोकरी सोडून आला असल्याचे समजते. साधारण दीड महिन्यापूर्वी उंबरठाण परिसरातून गुजरात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या संशयितांना अटक केली होती. या संशयितांनी गुजरातमधील वापी, धरमपूर परिसरात बनावट नोटा चलनात आणल्या होत्या. या घटनेस दीड महिना उलटत नाही तोच दुसरे रॅकेट उघडकीस आले आहे. यात सात जणांना अटक झाली आहे.

उंबरठाण येथे सहा सप्टेंबर रोजी एका भाजी विक्रेत्या महिलेला शंभर रुपयांची बनावट नोट दिली असता ती भाजी विक्रेत्यांनी ओळखली. यावेळी नागरिकांनी बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यास चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. यामध्ये हरिश वाल्मिक गुजर (वय २९, रा. विंचूर रोड, येवला), बाबासाहेब भास्कर सैद (वय ३८, रा. चिंचोडी खुर्द, येवला), अक्षय उदयसिंग रजपूत (वय ३२, रा. येवला) यांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासणी केली असता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले. या तिघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे. यापैकी अक्षय राजपूतची कसून चौकशी केली असता त्याने अन्य चार साथीदारांची नावे सांगत संबंधित नोटा कुठे व कशा तयार होतात, याचा मुख्य सूत्रधार कोण, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित आरोपी प्रकाश रमेश पिंपळे (वय ३१, रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (वय २७, रा. चांदवड), आनंदा दौलत कुंभार्डे (वय ३५, रा. चांदवड), किरण बाळकृष्ण गिरमे (वय ४५, रा. विंचूर) यांच्याकडून ९ लाख ७८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सपोनि. प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पराग गोतुर्णे, गंगाधर ढुमसे, हेमंत भालेराव, संतोष गवळी करत आहेत.

 

------------------

दोघांना पोलीस कोठडी

चौघांपैकी प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांची दि. १३ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर आनंदा कुंभार्डे व किरण गिरमे या दोघांना अधिक तपासाकरिता पोलीस कोठडी मिळाली आहे. विशेष म्हणजे आनंदा कुंभार्डे हा सैन्य दलातील नोकरी सोडून आलेला तरुण आहे, असे समजते, तर किरण गिरमे याचा सुमारे वीस वर्षांपासून विंचूर येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू होता, असे समजते.

----------------------------------

सुरगाणा पोलिसांनी नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आणून जप्त केलेल्या नकली नोटांसमवेत साहित्य. (१४ सुरगाणा नोटा १/२)

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक