शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

दाखलच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:48 IST

जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ही दीडपटीहून अधिक ठरली आहे.

ठळक मुद्देकोरोनाची तीव्रता होतेय कमी : दिवसभरात ३ बळी; २७२ बाधित

नाशिक : जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ही दीडपटीहून अधिक ठरली आहे.गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे प्रयत्न प्रशासनासह आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. तसेच अधिकाधिक रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच रविवारी बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या प्रथमच ४३४ झाली. दरम्यान, रविवारी गेलेल्या बळींपैकी दोन बळी नाशिक शहरातील सिडकोतील, तर एक बळी हा त्र्यंबकेश्वरचा आहे.जिल्ह्यात रविवारी दाखल संशयितांची संख्यादेखील हजाराच्या खाली घसरून ८२५ वर आली. तसेच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ८११ वर पोहोचली आहे. रविवारी बाधित झालेल्या नवीन २७२ रुग्णांमुळे आतापर्यंतची एकूण बाधितसंख्या १२,१६२ झाली असून, त्यातील ९०३५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या २,६७० झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य