शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:28 IST

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी बूथ उभारण्यात येणार असून, त्यानंतर मंगळवारपासून (दि.२१) घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांमार्फत बालकांना डोस दिला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचे उद्दिष्ट : आरोग्यसेविका जाणार घरोघरी

नाशिक : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी बूथ उभारण्यात येणार असून, त्यानंतर मंगळवारपासून(दि.२१) घरोघरी जाऊन आरोग्य सेविकांमार्फत बालकांना डोस दिला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जगजागृती केली जात आहे. गावोगावी दवंड्या पिटण्याबरोबरच भिंती रंगविल्या जात आहेत.राज्यात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे असून, त्यात पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पोलिओ निर्मूलन टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत असून, त्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच मोहिमेची जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गावागावात जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, त्यात गावांमध्ये दवंडी देणे, भिंतीवर म्हणी लिहिणे, पोस्टर, बॅनर, ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली जात आहे. पल्स पोलिओ मोहिमेच्या आदल्या दिवशी शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक गावांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेवर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश नांदापूरकर, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र निकम आदी लक्ष ठेवून आहेत.जिल्हाभरात ३५६१ बूथ उभारणारनाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात एकूण ४,५४,२०१ लाभार्थी बालके असून, त्यांना डोस देण्यासाठी ३५६१ बुथचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ९१६६ कर्मचारी बूथवर काम करणार आहेत. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी ७२६ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, २१ जानेवारीपासून ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस ही मोहीम राबवून घरोघरी जाऊन राहिलेल्या बालकांना लस पाजण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य