शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोविशील्डचे दीड लाख डोस मागवणार, मनपा आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

By संजय पाठक | Updated: March 18, 2021 21:27 IST

नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसीकरणात अडचणी येऊ नये यासाठी आणखी २४ रूग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोना विरोधातील लढारविवारी लॅबची चाचणी

नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसीकरणात अडचणी येऊ नये यासाठी आणखी २४ रूग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या संदर्भात आयुक्त जाधव यांनी ही माहिती दिली.

प्रश्न- शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात अडचणी येत आहेत.आयुक्त- होय. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन प्रकारचे डोस नाशिकमध्ये प्राप्त झाले आहेत मात्र, त्यातील कोविशिल्डचे डोस संपले आहेत. अगोदरच त्याची तयारी म्हणून दीड लाख डाेस मागवण्यात आले आहेत. ते शुक्रवारी प्राप्त होतील. त्यामुळे शनिवार रविवारी देखील लसीकरण करण्यात येईल. याशिवाय शहरात आणखी २४ खासगी रूग्णालयास लसीकरणाची सेाय करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रांवरील ताण कमी होईल.

प्रश्न- कोरेाना बाधीतांची संख्या वाढत असल्याने पुन्हा रूग्णालयांची गरज वाढु लागली आहे.आयुक्त- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेची आणि खासगी रूग्णालये मिळून एकूण ३ हजार ६३६ बेडसची सेाय करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या १ हजार १०७ रूग्णच रूग्णालयात उपचार घेत असल्याने ८६ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. परंतु सध्या रूग्ण वाढीचा वेग बघितला तर कदाचित कोरोना केअर सेंटर्स सुरू करावे लागतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू असून कंत्राटी पध्दतीने पाचशे आरोग्य- वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

प्रश्न- कोरोना चाचण्या वाढल्या तरी अहवाल खूप प्रलंबीत आहेत. महापालिकेची लॅब केव्हा सुरू होणार?आयुक्त- महापालिकेची कोविड लॅब सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या रविवारी त्यात दोन नमुने तपासून तेच आयसीएमआर मध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर साधारणत: २५ मार्च पासून लॅब सुरू हेाईल. त्यामुळे अहवाल प्रलंबीत राहण्याचे प्रमाण कमी होईल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या