शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख भाविकांची गडावर उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:45 IST

शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगगडावर एकच गर्दी केल्याने सकाळी ८ वाजेपासून बाºया लावण्यात आल्या.

ठळक मुद्देसहावी माळ : सकाळपासूनच लागल्या बाऱ्या; न्यायाधीशांच्या हस्ते महापूजा

कळवण : शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगगडावर एकच गर्दी केल्याने सकाळी ८ वाजेपासून बाºया लावण्यात आल्या.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांनी सहाव्या माळेला सपत्निक श्री भगवतीची पंचामृत अभिषेक व महापूजा केली. यावेळी जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा न्यायाधीश विशाल देशमुख, जिल्हा न्यायालयातील शिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्कअधिकारी भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर आदी उपस्थित होते. रविवारी दिवसभरात माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार विनायक मेटे, बडोदा घराण्याचे वंशज सत्यजित गायकवाड, सुरगाणा संस्थानचे वंशज रत्नशीलराजे पवार, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आपत्ती व्यवस्थापनचे राजीव चौबे यांनी कुटुंबीयासह भगवतीचे दर्शन घेतले.सकाळी ६ वाजता काकड आरती झाली. सकाळी ८ वाजता महापूजेला सुरु वात करण्यात येऊन भगवतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यात आले. पैठणी, शालू नेसवून देवीचा साजशृंगार करण्यात आला. यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी १२ वाजता महानैवेद्य आरती व सायंकाळी साडेसात वाजता आरती करण्यात आली.ट्रॉलीचे आकर्षणगडावरील पायºया टाळून देवीच्या दर्शलाना जाण्यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आली असल्याने ट्रॉलीतून जाऊन दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याने ट्रॉलीची प्रतीक्षा करत देवीभक्तांना थांबवावे लागले. नवरात्रोत्सवात फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्प देवीभक्तांचे आकर्षण ठरले आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNavratriनवरात्री