शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:47 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.वृक्षराजींचा आधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला असून, नैसर्गिक ठिकाणांवरही नागरिकांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. परिणामी वन्यजीव अनेकदा वाट चुकून शहरी भागात येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात भटकंती करताना आढळून आले होते. महिनाभरापूर्वी शरणपूररोड येथील एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून घोरपडीचे लहान पिल्लू वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा पूर्ण वाढ झालेली घोरपड एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ पश्चिम नाशिकचे वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, राजेंद्र ठाकरे, इको-एको वन्यजीवप्रेमी संघटनेचे वैभव कुलकर्णी, सुखदा गायधनी आदींनी हार्डवेअरच्या दुकानात पोहचून घोरपड सुरक्षितपणे ताब्यात घेतली. घोरपड तंदुरुस्त असल्यामुळे तिला नैसर्गिक अधिवासात वन कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक