पेठ -तालुक्यातील धोंडमाळ व कोहोर गटाच्या पायाभूत व मुलभूत सुविधा तसेच मार्ग व पुल दुरु स्ती अंतर्गत जवळपास एक कोटी ७० लक्ष रूपयांची विकासकामे मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांनी दिली आहे.विकासकामांमध्ये प्रामुख्याने, राणविहिर येथे रस्ता डांबरीकरण करणे ( २५ लक्ष रु पये),बेलपाडा येथे स्मशान भूमी बांधणे (५ लक्ष रु पये), बेलपाडा ते गारमाळ डांबरीकरण करणे(१५ लक्ष रु पये ,आडगाव ते अंधुरटे रस्ता डांबरीकरण करणे( १५ लक्ष रु पये ) आडगाव येथे हायमास्ट बसविणे (३ लाख रु पये), अंधुरटे येथे गावांतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण (७ लक्ष रु पये ), शिंगदरी ते रायतळे रस्ता डांबरीकरण करणे (१५ लक्ष रु पये ),शिंगदरी येथे गावांतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण करणे (३ लक्ष रु पये),मानकापूर ते डोंगरशेत रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष रु पये ),चिरेपाडा ते मोहोपाडा डांबरीकरण करणे( २५ लक्ष रु पये),मानकापूर येथे हायमास्ट बसविणे (३ लक्ष रु पये),चीकाडी पाडा येथे रस्ता कॉँक्रिटीकरण करणे मूलभूत योजने अंतर्गत रस्ता करणे(१० लक्ष रुपये),खोकरी पाडा येथे हायमास्ट बसविणे (३ लक्ष रु पये ),अमलोन येथे हायमास्ट बसविणे (३ लक्ष रु पये),कुळवंडी येथे हायमास्ट बसवणे ( ३ लक्ष रु पये) आदी विकास कामे केली जाणार आहेत.
पेठ तालुक्यात दीड कोटींची कामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:06 IST
रस्त्यांची कामे : धोंडमाळ-कोहोर गटात सुविधा
पेठ तालुक्यात दीड कोटींची कामे मंजूर
ठळक मुद्देचीकाडी पाडा येथे रस्ता कॉँक्रिटीकरण करणे मूलभूत योजने अंतर्गत रस्ता