शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:26 IST

गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे.

ठळक मुद्देलखमापूर : भरघोस आर्थिक उत्पन्न; द्राक्ष पिकाला दर मिळत नसल्याने बळीराजाचा प्रयोग

लखमापूर : गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे.दिंडोरी तालुक्यातील खतवड हे द्राक्ष पिकविणाºया गावांमधील एक महत्त्वाचे गाव समजले जाते, परंतु दिवसेंदिवस द्राक्ष शेती करणे फार अवघड होत चालले आहे. महागड्या औषधांचा वापर करून द्राक्ष पीक घेतले जाते. जेवढे उत्पन्न त्यातले ३० ते ३५ टक्के भांडवल अगोदर खर्च करावे लागते. नंतर हातात पैसा हे गणित द्राक्षे हंगामाचे राहते. त्यामुळे खूप मेहनत, भरपूर भांडवल, मनुष्य बळ हे सर्व करूनही घेतलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही, म्हणून शेतकरीवर्ग नाराज होत चालला आहे.या संकटांना न घाबरता प्रयोगशील शेतकरी गोकुळ महाराज खुर्दळ यांनी नवीन प्रयोग करीत एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून, त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचा प्रयोग करून संकटातून बाहेर पडण्यासाठी भाजीपाला शेतीचा मार्ग शोधला आहे.गोकुळ महाराज खुर्दळ हे सध्या देहू येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून, संत सावता महाराज यांच्या ‘कांदा, मुळा, भाजी... अवघी विठाई माझी’ या अंभगाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या शेतात द्राक्ष पिकांची झाडे काढून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीचा वापर करीत भाजीपाला शेती करण्यास सुरु वात केली आहे. भाजीपाला शेती चांगली येत असल्याने आणि योग्य दर मिळण्यास चांगली मदत होत आहे.

मागील तीन वर्षांपासून आम्हाला द्राक्ष पिकाला खूप मेहनत करूनही योग्य दर मिळत नव्हता. कर्ज मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही शेतीमध्ये बदल करण्याचे ठरविले व द्राक्षबागा तोडून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीची भाजीपाला शेती सुरू केली, आम्हाला त्यामध्ये यश मिळत आहे. - गोकुळ महाराज खुर्दळ, खतवड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी