शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

ओम नम: शिवाय... ओम नम: शिवाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:32 IST

ओम नम: शिवाय.. ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवायच्या गजरामध्ये परिसरातील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर भाविकांनी पूजा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

नाशिकरोड : ओम नम: शिवाय.. ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवायच्या गजरामध्ये परिसरातील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर भाविकांनी पूजा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.  महाशिवरात्रीनिमित्त चेहेडी पंपिंग येथील वालदेवी-दारणा नदी संगमावरील श्री संगमेश्वर महादेव मंदिर, मुक्तिधाम, श्री दुर्गा देवी मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बिर्ला मंदिर, देवळाली गावातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, धनगर गल्लीतील श्री महादेव मंदिर, देवळालीगाव श्री गणपती विसर्जन स्थान येथील श्री महादेव मंदिरात सोमवारी सकाळपासून भाविकांनी पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी झाली होती. आनंदनगर येथे जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त श्री महादेवाच्या पिंडीचा देखावा साकारण्यात आला होता. दिवसभर धार्मिक गीते लावून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विहितगाव श्री विठ्ठल मंदिराजवळील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी मांडव डहाळेची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, नगरसेविका सुनीता कोठुळे आदींच्या हस्ते पूजा करण्यात आली.देवळालीगावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त महाशिवरात्रीला पंचकमिटीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, सूर्यभान घाडगे, रूंजा पाटोळे, कैलास चव्हाण, पुंडलिक खोले, संपत खोले, महेश देशमुख, नगरसेवक सूर्यकांत लवटे आदींच्या हस्ते श्री म्हसोबा मूर्तीला महाअभिषेक करून दागिने अर्पण करण्यात आले.जेलरोड लोखंडे मळा येथील श्री महादेव मंदिरात सकाळी महापूजा करून दिवसभर खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी पार्वताताई लोखंडे, छगनराव लोखंडे, विलास लोखंडे, विलासराज गायकवाड, अमोल मोरे, सचिन चव्हाण, विनता लोखंडे, शरद साळवे, सोनू जाधव, विनोद जाधव, ज्ञानेश्वर थित्ते आदी उपस्थित होते.जेलरोडच्या नांदूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात सोमवारी दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. ओम गुरुदेव माउली भक्त मंडळ व मनसेचे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले यांच्यातर्फे दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल ढिकले, गिरीश जगताप, विक्रम खरोटे, सागर भोजने, दिनेश नाचन, संतोष मते, विजू भिसे, देवीदास गांगुर्डे, प्रवीण बागुल, संतोष नरवडे, दीपक वर्पे, कैलास नरवडे, रोहिणी पिल्ले, अनिता पिल्ले, सुरेखा गांगुर्डे, सुनीता डोखे, सीता रेड्डी, उज्ज्वला जाधव, सिद्धार्थ रणशूर, विशाल पिल्ले, प्रेम भदाने, सुनील भंडारी आदी उपस्थित होते.जेलरोड समर्थनगरमधील नागेश्वर महादेव मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा करून महाआरती करण्यात आली. महादेव महिला मंडळाने हरिपाठ पारायण व हभप शरद महाराज सालगावकर यांनी कीर्तन सादर केले.यावेळी रामदास महाराज दुबे, भानुदास महाराज दुबे, राजू महाराज गायखे, शिवा महाराज दुबे, संजय ढिकले, बाळासाहेब शिंदे, सुरज ढिकले, अजिंक्य ढिकले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीNashikनाशिक