शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने अखेर विवाह केला ‘कबुल’; न्यायालयाकडून सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:21 IST

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अ‍ॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अ‍ॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तूने विवाह मान्य केला

ठळक मुद्दे १५ हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन पोलीस पत्नीने छळ व फसवणूकीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती

नाशिक : ‘ऑलिम्पिक'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोइंगपटू दत्तू भोकनळविरूध्द त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणूकीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन.जी.गिमेकर यांच्या न्यायालयात बुधवारी (दि.२९) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायलयाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तडजोडसाठी दिलेल्या वेळेत दत्तू व त्याची पत्नी आशा दोघांचे वकील यांच्यात समझौता होऊन दत्तूने विवाह न्यायलयात मान्य केला.नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आशा दत्तू भोकनळ यांनी १६ तारखेला त्यांचे पती दत्तूविरूध्द फसवणूक व छळ केल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात केली होती. आशा यांनी फिर्यादीत दत्तू यांच्यासोबत २२ डिसेंबर २०१७ साली खेड तालुक्यातील आळंदी येथे जय अंबे मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पध्दतीने विवाह दोघांच्या सहमतीने केल्याचे म्हटले होते. ३ फेबु्रवारी २०१९ रोजी दत्तू यांनी आशा यांच्या आडगाव येथील घरी येऊन ९ फेब्रुवारी रोजी गावाकडे पुन्हा लग्न करायचे ठरविले व दोघांनी कुटुंबियांना माहिती दिली. चांदवडमधील एक लॉन्स १० हजार रूपये आगाऊ देऊन आशा यांच्या कुटुंबीयांनी नोंदविले; मात्र ७ फेब्रुवारी रोजी दत्तू यांनी फोनवरून लग्न करणार नसल्याचे कळविल्याचे फिर्यादीत आशा यांनी म्हटले होते. १३ व १४ तारखेला दत्तू यांनी पुन्हा घरी येऊन वाद घालत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. पुन्हा २४ तारखेला संगमनेर येथे एका लॉन्समध्ये लग्न करण्याचे त्यांनी मान्य केले आणि आशा यांच्या वडिलांनी संगमनेर येथे जाऊन लॉन्स बूक केले व लग्नाची पुन्हा तयारी केली. पुन्हा दत्तू याने फोनवरून लग्नास येण्यास नकार दिला. त्यामुळे आशा भोकनळ यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून १६ मे रोजी दत्तूविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू झाली. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अ‍ॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अ‍ॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तूने विवाह मान्य केला. न्यायालयाने अटी व शर्तीच्या अधिन राहून दत्तूला जामीन दिला.

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय