शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काळाराम मंदिरात आढळल्या पुरातन पायऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:31 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत कुतूहल : चबुतरा असण्याची शक्यता; बघ्यांची वाढली गर्दी

पंचवटी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे. काही दिवसांपासून राम मंदिर परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. गुरुवारी खोदकाम करताना पायºया आढळून आल्यानंतर काम थांबविण्यात येऊन रात्री पुन्हा पूर्व दरवाजा बाहेर रस्त्याचे खोदकाम केले जाणार आहे, असे काळाराम संस्थानच्या वतीने विश्वस्तांनी सांगितले.शेकडो वर्षांपूर्वी उभारलेल्या काळाराम मंदिराबाहेर आढळून आलेल्या जुन्या पायºया पूर्वीच्या मूळ बांधकामाच्या वेळच्या असल्याचे बोलले जात आहे तर पूर्वी या ठिकाणी पायºया तसेच बसण्यासाठी पूर्व दरवाजाजवळ अडीच ते तीन फुटाचा ओटा असल्याचे जुन्या नागरिकांनी सांगितले. राम मंदिराबाहेर खोदकाम करत असताना पायºया आढळून आल्याचे मेसेज व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेकडो नागरिकांनी जुन्या पायºया बघण्यासाठी गर्दी केली होती. खोदकाम चालू असताना पायऱ्यांच्या ठिकाणी एक लोखंडी नालदेखील आढळून आली आहे तर मुख्य पूर्व दरवाजाच्या दोन्ही बाजूला अडीच ते तीन फुटापर्यंत दगडी ओटे असल्याचे आढळून आले.गुरुवारी रात्रीपासूनच पुन्हा मंदिरासमोरचा रस्ता खोदकाम केल्यानंतर चबुतरा तसेच पायºया आढळून येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. साडेचार फूट खोलीपर्यंत पायºया आढळून आल्याने पूर्वी परिसरात रस्ता असावा व त्यानंतर वारंवार त्याठिकाणी दगड-माती यांची भर टाकली गेल्यानंतर पायºया पूर्णपणे बुजल्या गेल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्व दरवाजाजवळ दोन्ही बाजूला दगडी ओटे असल्याने त्याठिकाणी बसण्याची जागा होती हे निश्चित झाले आहे. रात्री मंदिर परिसर समोरील रस्ता खोदकाम करण्यात येणार असून, त्यानंतरच पायºयांचे गूढ उकलले जाईल, असे मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर