Older mother murdered for drinking alcohol | स्मार्ट पार्किंग प्रायोगिक तत्त्वावरच
स्मार्ट पार्किंग प्रायोगिक तत्त्वावरच

नाशिक : दुकांनासमोर वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी तब्बल २८ रहदारीचे मार्ग निवडण्यात आले असून, त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. तथापि, अशाप्रकारची स्मार्ट पार्किंग प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यातून अडचणी लक्षात आल्यानंतर त्या दूर करण्यात येतील अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. त्याचबरोबर दुकानात किरकोळ खरेदीसाठी येणाºया नागरिकांना भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी त्यांना कशी सूट देता येईल याबाबत अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनतळ सुरू केले असून वाहनतळ सशुल्क असल्याने लवकरच त्याठिकाणी नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. मुळात रस्त्यावर वाहनतळाची महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत तरतूद नाही. त्यातच महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी नाही की महापालिकेच्या स्थायी समितीने कर आणि दर न ठरविताच स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेच्या मिळकतींवर आक्रमण केले असून, त्यासंदर्भात नगरसेवकदेखील अंधारात आहेत. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली. यातील कायदेशीर मुद्दे अनेक असले तरी मुळातच शहरातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुलासमोरील रस्त्यावर पे अ‍ॅण्ड पार्क सुरू करून नागरिकांंबरोबरच त्या दुकानदारांचीदेखील कोंडी करण्यात आली आहे. किरकोळ खरेदीसाठी कोणत्याही दुकानात जाताना वाहन उभे करायचे म्हणून दहा ते पंधरा रुपये शुल्क भरावे लागत असेल तर ग्राहक त्या दुकानांकडे पाठ फिरवतील.
स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे हे गुरुवारी (दि.१८) नाशिकमध्ये बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात आयुक्तराधाकृष्ण गमे यांना दखल घेऊन सुधारणा करण्यास सांगितले होते. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२३) पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सदरची पार्किंग प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यात येणाºया अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एखाद्या दुकानात खरेदीसाठी अल्पकाळ ग्राहक गेल्यास त्याला आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी अल्पकाळ वाहन लावल्यास काही सवलत देता येईल काय याबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यात येणार आहे, असे गमे यांनी सांगितले.
रस्त्याची जागा दुकानदारांची नाही !
शहरातील व्यापारी संकुलांसमोर स्मार्ट पार्किंग सुरू करून शुल्क वसूल करण्यावरून दुकानदारांची ओरड सुरू असली तरी मुळात रस्त्याची जागा महापालिकेच्या मालकीची असून, दुकानदारांची नाही, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. तथापि, दुकानांच्या सामासिक अंतराच्या पुुढे स्मार्ट पार्किंग केल्याने ग्राहक त्या दुकानदाराकडे कसे काय जाऊ शकतील हा प्रश्न कायम आहे. त्यातच व्यापारी संकुलातील दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर गाडी उभी करताना भुर्दंड मोजावा लागेल त्याचे काय त्याबाबत मात्र आयुक्तांनी खुलासा केलेला नाही.
ठेकेदारच्या
कर्मचाºयाची मुजोरी, ज्येष्ठ नगरसेविकेलाच अडविले..
स्मार्ट पार्किंगची वसुली अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, वसुली कर्मचारी तैनात झालेले आहेत. कॉँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील या कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझासमोर माध्यम प्रतिनिधींना मुलाखत देत असताना एका वसुली कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि स्मार्ट पार्किंगवर काही बोलायचे असेल तर आधी आमच्या साहेबांशी बोला, असे बजावले. याप्रकारामुळे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, ठेकेदारच्या कर्मचाºयांना असले अधिकार दिले कोणी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title:  Older mother murdered for drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.