शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नव्या नॉबच्या सिलिंडरला जुन्या रेग्युलेटरचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:39 IST

शहर व परिसरातील नागरिकांना सध्या स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर वापरताना एक नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : शहर व परिसरातील नागरिकांना सध्या स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर वापरताना एक नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांकडून अचानकपणे नवे नॉब असलेले गॅस सिलिंडर पुरविले जात असल्याने ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर त्या सिलिंडरवर सहजासहजी योग्यरीत्या बसत नसल्यामुळे ग्राहकांना डोकेदुखीसोबत धोकाही वाढला आहे. या समस्येविषयी वितरकांकडे अनेकदा तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरची सर्व सुरक्षा रेग्युलेटरवर अवलंबून असते. रेग्युलेटर योग्यपणे बसविला गेला नाही किंवा त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्यास गॅसगळती होऊन स्फोट होऊन आग लागण्याचा धोकाही उद्भवू शकतो. नव्या नॉबच्या सिलिंडरवर काहीही करून रेग्युलेटर बसत नाही. त्यामुळे वितरकांशी संपर्क साधून नागरिकांना अवेळी कारागिरांची मदत घ्यावी लागते. स्वयंपाकघरातील सिलिंडर कधीही संपत असल्यामुळे राखीव सिलिंडरला रेग्युलेटर लावणे हे ‘दिव्य’ ठरत आहे. रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.तोडगा काढणार कोण?विविध कंपन्यांच्या वितरकांकडून केल्या जाणाºया गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यादरम्यान नव्या नॉबच्या सिलिंडर आणि ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर यांचे समीकरण जुळविण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. सिलिंडरच्या नव्या नॉबचा आकार हा काहीसा अधिक असल्यामुळे कारागीरदेखील ग्राहकांना जेव्हा अशा सिलिंडरवर रेग्युलेटर बसवितात त्यावेळी नॉबला घासून घेतात; मात्र जेव्हा सिलिंडर संपते तेव्हा ग्राहकांची रेग्युलेटर काढताना पुन्हा दमछाक होते.कुणाची म्हैस अन् कुणाला ऊठबैसगॅस सिलिंडरच्या नॉबची समस्या हा कंपन्यांचा प्रश्न जरी असला तरी त्याचा मनस्ताप मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ग्राहकांना गॅस नोंदणीच्या वेळी रेग्युलेटरचा एकदाच पुरवठा केला जातो, त्यामुळे नवे रेग्युलेटर ग्राहक पुन्हा खरेदी करू शकत नाही. नवे नॉब असलेल्या सिलिंडरला रेग्युलेटर सहजरीत्या न बसणे यास ग्राहक जबाबदार नसून कंपनी जबाबदार आहे; मात्र गैरसोय ग्राहकांची होत असल्याने कुणाची म्हैस अन् कुणाला ऊठबैस अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक